मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पप्पा तु परत ये, डोळ्यात पाणी आणणारा दहा वर्षीय चिमुकल्याचा 15 ओळींचा निबंध

पप्पा तु परत ये, डोळ्यात पाणी आणणारा दहा वर्षीय चिमुकल्याचा 15 ओळींचा निबंध

बापाचे छत्र हरवलेल्या या चिमुकल्याने लिहिलेला निबंध वाचल्यावर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

बापाचे छत्र हरवलेल्या या चिमुकल्याने लिहिलेला निबंध वाचल्यावर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

बापाचे छत्र हरवलेल्या या चिमुकल्याने लिहिलेला निबंध वाचल्यावर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

  • Published by:  Akshay Shitole
बीड, 18 जानेवारी: शाळेत निबंध लिहिण्यासाठी वेगवेगळे विषय दिले जातात. त्यात लहान मुलं त्यांच्या आकलनाप्रमाणे जे सुचतं ते लिहित असतात. कधी ते गमतीशीर असतं तर कधी मनाला भिडणारं. आता सोशल मीडियावर असाच एका चौथीतल्या मुलाने लिहिलेला निबंध व्हायरल होत आहे. बापाचे छत्र हरवलेल्या या चिमुकल्याने लिहिलेला निबंध वाचल्यावर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये वर्ग शिक्षकांनी सगळ्या मुलांना 'माझे बाबा' या विषयावर निबंध लिहिण्यास सांगितला. मुलाच्या मनातील बाबांबद्दलच्या भावना आणि परिस्थिती कागदावर उतरली. त्यावेळी या चिमुकल्याचा निबंध वाचून शिक्षकांचंही मन सुन्न झालं. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा निबंध मंगेश परमेश्वर वाळके या मुलाचा आहे. तो आष्टी तालुक्यातील गावात राहातो. काही दिवसांपूर्वी त्यानं वडिलांचं छत्र गमवलं. त्याचे वडील टीबीने आजारी होते. मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. या मुलानं आपल्या निबंधातून आपल्या घरची परिस्थिती आणि त्याच्या मनातील भावना मांडल्या आहेत. अवघ्या 10 ते 11 वर्षांच्या या चिमुकल्याने लिहलेले शब्द काळजाला भिडणारे असेच आहेत. त्यानंतर निबंधात म्हटलंय की, त्याचे वडील गवंडीकाम करायचे. तर आई दिव्यांग आहे. वडिलांचं छत्र हरपल्यानंतर सगळी जबाबदारी या चिमुकल्यावर आली आहे. आईला मदत करून तो शाळेत जातो. त्यांना कुणी मदत करत नाही. त्याच्या मनातील भीती आणि घरातील हालाखीच्या परिस्थिती याचं भीषण वास्तव सांगणारा हा निबंध वाचल्यानंतर आपल्या डोळ्यात पाणी आणतो.
First published:

Tags: Beed, Beed news

पुढील बातम्या