चालत्या कारमध्ये Facebook Live करताना अपघात, दोन भावांचा मृत्यू

चालत्या कारमध्ये Facebook Live करताना अपघात, दोन भावांचा मृत्यू

या अपघाताची बातमी जेव्हा त्यांच्या मित्रांना कळाली तेव्हा त्या सर्व मित्रांनाही मोठा धक्का बसलाय.

  • Share this:

नागपूर 16 जून :  Facebook Liveची तरुणांमध्ये सध्या प्रचंड क्रेझ आहे. मात्र त्याचा अतिरेक केला तर ते जीवावर बेतू शकतं. नागपूरमध्ये चालत्या कारमध्ये Facebook Live करत असताना अपघात घडला आणि त्यात दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी कारमध्ये सहा मित्र होते. कारमधले इतर 4 तरुणही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना हॉस्पिलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

नागपूर काटोल रोडवरील हाथला परिसरात ही घटना घडली. ही सगळी मित्रमंडळी नागपूरहून काटोल कडे जात होती. जाताना त्यांनी अनेक गाड्यांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. कारचा असलेला प्रचंड वेग. हातात मोबाईलवर सुरू असलेली कॉमेंट्री आणि मित्रांचा हास्यविनोद याच कार चालविणाऱ्या तरुणाचं कारवरचं नियंत्रण सुटलं.

जो तरुण कार चालवत होता तो धुम्रपानही करत असल्याचं  Facebook Liveवरुन दिसून येतं. कार चालविणाऱ्या तरुणाचं कारवरील नियंत्रण सुटले आणि कार झाडावर आदळली .या घटनेत दोन सख्या भावांचाय मृत्यू चालक पुंकेश पाटील आणि संकेत पाटील असे मृतकांचे नावे आहेत. तर कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

पुंकेश पाटील याच्या Facebook पेजवरून हे Live सुरू होतं. त्यावेळी त्याचे मित्र खाली कॉमेंटही करत होते. मात्र अचानक काहीतरही गडबड झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळी अनेकांनी त्यांना काय झालं असा प्रश्नही विचारला होता. या अपघाताची बातमी जेव्हा त्यांना कळाली तेव्हा त्या सर्व मित्रांनाही मोठा धक्का बसलाय.

First published: June 16, 2019, 11:10 PM IST

ताज्या बातम्या