जेवणाच्या अवाजवी दरांमुळे पर्यटकांची गुहागरकडे पाठ

जेवणाच्या अवाजवी दरांमुळे पर्यटकांची गुहागरकडे पाठ

रत्नागिरीतल्या गुहागर किनाऱ्यावर मात्र वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. किनारपट्टीवर असलेली गैरसोय ,जेवणाचे अवाजवी दर यामुळे पर्यटकांनी गुहागरकडे पाठ फिरवल्याचं चित्र इथल्या घटलेल्या गर्दीमुळे दिसत आहे.

  • Share this:

स्वप्निल घाग, 24 डिसेंबर : नाताळ आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोकणातले बीच आता पर्यटकांनी तुडुंब भरलेले पाहायला मिळत आहेत.नव्या वर्षाच्या स्वागताला पर्यटक कोकणच्या किनार पट्टीवर दाखल झालेयत. मात्र रत्नागिरीतल्या गुहागर किनाऱ्यावर मात्र वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. किनारपट्टीवर असलेली गैरसोय ,जेवणाचे अवाजवी दर यामुळे पर्यटकांनी गुहागरकडे पाठ फिरवल्याचं चित्र इथल्या घटलेल्या गर्दीमुळे दिसत आहे.

गुहागरला निसर्गाने भरभरून दिलेय हे जरी खरं असलं तरीही जेवणाचे अवास्तव दर पर्यटकांना नाराज करणारे ठरत आहेत. इथल्या अवाजवी किंमतीमुळे पर्यटक दापोली रत्नागिरी तसेच तळकोकणाचा विचार करत आहेत. त्यामुळे गुहागरमध्ये पर्यटकांची संख्या अतिशय कमी असल्याचं येथील मोकळ्या किनारपट्टीमुळे स्पष्ट होत आहे.

गुहागरमध्ये MIDC अथवा इतर मोठे उद्योग नसल्यामुळे केवळ पर्यटन हाच इथला मुख्य व्यवसाय आहे. मात्र अविकसित पर्यटन स्थळे तसेच किनारपट्टी लगत झालेल्या निकृष्ट कामांमुळे पर्यटक गुहागर मध्ये थांबत नाहीत.ते इतर पर्याय निवडतात.

इथे असलेली पर्यटन स्थळे विकसित होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे बनलंय अन्यथा मोठ्ठ नाव असून देखील डिसेंबरचे काही दिवस वगळता गुहागरमध्ये पर्यटक येतील का ? हा भविष्यातला चिंतेचा विषय गुहागरवासीयांसमोर असेल एवढं मात्र नक्की.

First published: December 24, 2017, 2:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading