मुल होत नाही म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ, अखेर गुन्हा दाखल

मुल होत नाही म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ, अखेर गुन्हा दाखल

या प्रकरणी विवाहितेने पतीसह सासरच्या मंडळीविरोधात भिवंडी शहर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

  • Share this:

भिवंडी, 15 डिसेंबर : विवाहितेला मुलबाळ होत नसल्याने तसेच तिने माहेरून हुंडा म्हणून पैसे आणावेत यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विवाहितेने पतीसह सासरच्या मंडळीविरोधात भिवंडी शहर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पती अमिन सुलेमान सोडा, सासरा सुलेमान इब्राहिम सोडा, नणंद समीरा सोडा, सवत हसीना अब्बास गजिया ( सर्व राहण्यास सालया, खंबालिया, गुजरात ) असे विवाहितेच्या छळ प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या सासरच्या मंडळींची नांवे आहेत.

विवाहिता शाकिरा हिचे 27 नोव्हेंबर 2015 रोजी अमिन याच्याशी मुस्लिम धर्मानुसार निकाह झाला होता. मात्र शाकिरा हिने माहेरहून हुंडा म्हणून पैसे आणावेत तसेच लग्नाला चार वर्षे उलटूनही मुलबाळ होत नाही. या कारणावरून सासरच्या मंडळीने तिला टोमणे मारून नाहक छळ करून मानसिक व शारीरिक त्रास दिला. लग्नात आई-वडिलांनी दिलेल्या सामानाचा अपहार केला आहे.

रोजच्या छळाला कंटाळून शाकीराहिने माहेर गाठून पती अमिन याच्यासह सासरा ,नणंद व सवत यांच्याविरोधात भादंवि.498,( अ ) ,406, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश दाभाडे करीत आहे.

बलात्कार लपवण्यासाठी तरुणीच्या प्राइव्हेट पार्टमध्ये गोळी झाडून हत्या, काँग्रेस नेत्याने शेअर केली संतापजनक घटना

काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या धक्कादायक घटनेची माहिती शेअर केली आहे. हरियाणामधील एका बलात्कार प्रकरणाबद्दल हे ट्वीट केलं आहे. या घटनेमध्ये नराधमांनी एका 22 वर्षीय तरुणीवर अत्याचार केला आणि तिच्यावर तीन गोळ्या झाडून हत्या केली. भयंकर म्हणजे, या नराधमांनी मृत पीडितेच्या प्राइव्हेट पार्टमध्ये गोळी झाडून तिची हत्या केली.

माणुसकीची हत्या करणारी ही घटना हरियाणामध्ये घडली आहे. आरोपींनी बलात्काराचे प्रकरण समोर येऊ नये म्हणून हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. सुरजेवाला यांनी या बातमीची लिंक शेअर करत म्हटलं आहे की, निर्भया, कठुआ, उन्नवा आणि हैदराबाद प्रकरणापेक्षा ही घटना मन सुन्न करणारी आहे. ही बातमी वाचून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. माणुसकीच्या कौर्याची सीमा गाठणारी या घटनेबद्दल कुणी ऐकणार का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2019 01:09 PM IST

ताज्या बातम्या