Home /News /maharashtra /

भिवंडीत मर्डर! ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर 10 वार करून चिरला गळा

भिवंडीत मर्डर! ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर 10 वार करून चिरला गळा

मुलगा घरी आला तेव्हा घराला दरवाजा लॉक होता. त्यानं घराचा दरवाजा उघडून बघितलं असता घरात रक्ताच्या थारोळ्यात आईचा मृतदेह पडला होता..

भिवंडी, 19 डिसेंबर: भिवंडी शहरातील (Bhiwandi City) तीनबत्ती परिसरात असलेल्या हाफसन आळी परिसरात एका 38 वर्षीय महिलेची धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण (Murder) हत्या करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एक संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. हेही वाचा... सोनिया गांधींनी महाराष्ट्रातील नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी, राष्ट्रीय सचिवपदीही बढती मिळालेली माहिती अशी की, लक्ष्मी उर्फ पूजा भुरला ( वय-30 ) असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिला ब्युटी पार्लरचा व्यवसाय करत असल्याची माहिती मिळली आहे. शनिवारी सकाळी ही महिला घरात एकटीच होती. अज्ञात मारेकरूने महिलेच्या घरात घुसून तिच्या शरीरावर धारदार शस्त्रानं 9 ते 10 वार करत गळा चिरून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. मयत महिलेचा मुलगा रात्रपाळीचे काम आटपून सकाळी घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उजेडात आला. मुलगा घरी आला तेव्हा घराला दरवाजा लॉक होता. त्यानं घराचा दरवाजा उघडून बघितलं असता घरात रक्ताच्या थारोळ्यात आईचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे मुलाला प्रचंड धक्का बसला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस व फॉरेंसिक लॅबचे पथक दाखल होऊन पंचनामा करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सुरु असून ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याची माहिती अद्याप समजू शकली नाही. हेही वाचा...पालकांकडून मुलाचं Pornography Collection नष्ट;आता कोर्टाकडून नुकसान भरपाईचे आदेश ओळखीतील व्यक्तीकडून हत्या? ओळखीतील व्यक्तीकडून महिलेचा खून करण्यात आला असावा, असा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. विशेष म्हणजे महिलेच्या घराचा दरवाजा आतून उघडण्यात येऊन महिलेची हत्या करण्यात आली आहे. घरातील एकही वस्तूची चोरी झालेली नाही. शहर पोलीस या घटनेचा सखोल तपास करीत आहेत.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Bhiwandi, Crime news

पुढील बातम्या