मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गरबा खेळताना काळजी घ्या! बुलडाण्यात आणखी एकाचा हृदयविकाराच्या धक्काने मृत्यू

गरबा खेळताना काळजी घ्या! बुलडाण्यात आणखी एकाचा हृदयविकाराच्या धक्काने मृत्यू

 बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात येणाऱ्या जानेफळ या गावात ही घटना घडली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात येणाऱ्या जानेफळ या गावात ही घटना घडली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात येणाऱ्या जानेफळ या गावात ही घटना घडली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Buldana (Buldhana), India
  • Published by:  sachin Salve

राहुल खंदारे, प्रतिनिधी

बुलडाणा, 04 ऑक्टोबर : राज्यभरात नवरात्रोत्सव यंदा धुमधडाक्यात साजरा होत आहे. पण मागील दोन दिवसांपासून गरबा खेळत असताना तरुणांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता बुलडाण्यामध्ये एका 42 वर्षीय इसमाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात येणाऱ्या जानेफळ या गावात ही घटना घडली आहे. विशाल पडधरीया (वय 42) असं या इसमाचं नाव आहे.  या गावात वीर सावरकर नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने गरबाचे आयोजन करण्यात आले होते.  विशाल पडधरीया हे गरबा खेळण्यासाठी आले होते.  गरबा खेळताना अचानक विशाल यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांना तातडीने  स्थानिक रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.

विशाल हे दरवर्षी मोठ्या उत्साहात गरब्यामध्ये सहभागी होत होते. मात्र यंदा गरबा खेळताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूने जानेफळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

(हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात कशी दिसतात लक्षणं)

दरम्यान, नवरात्रीच्या उत्साहात काही तरुणांनी आपला जीव गमावला आहे.  सलग दरदिवशी गरब्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी कानावर पडते आहे. महाराष्ट्रातच 4 आणि गुजरातमध्ये एक असे एकूण 5 बळी या नवरात्रीत गेले आहे.

1) विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथे राहणारा मनीष नरपत जैन आपल्या बिल्डिंगच्या आवारात गरबा खेळत होता त्यावेळी त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला.

2) डोंबिवलीत राहणारा 27 वर्षीय ऋषभ लहरी मंगे भानुशाली मुलुंडमध्ये गरबा खेळायला गेला होता, तेव्हा त्याला हार्ट अटॅक आला.

3) वाशिममध्ये गोपाल इन्नानीला गरबा खेळताना हार्ट अटॅक आला.

4) तर वाशिमच्याच सुशील काळेला गरबा खेळून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी हार्ट अटॅक आला.

5) गुजरातच्या तारापूरमधील 21 वर्षीय वीरेंद्र सिंगचा गरबा खेळताना हार्ट अटॅक आल्याचा व्हिडीओही व्हायरल होतो आहे.

तारापूर येथे आदी शिवशक्ती सोसायटीमध्ये गरबा खेळत असताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

गरबा खेळताना का येऊ शकतो हार्ट अटॅक?

याबाबत माहिती देताना महाराष्ट्र आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं की, गरबा हा एक प्रकारचा नाच आहे. जो एरोबिक एक्सरसाइझमध्ये येतो. यामध्ये संपूर्ण शारीरिक हालचाल होते. काही मिनिटं गरबा खेळणं ठिक आहे पण शक्यतो गरबा दीर्घकाळ खेळला जातो. अशावेळी आरोग्याच्या काही समस्या असतील तर जीवावर बेतू शकतं.

ज्यांचं हृदय कमकुवत आहे, हृदयाच्या समस्या आहेत, बीपी आहे, त्यांना गरबा खेळताना त्यांच्या हृदयावर ताण येऊन हार्ट अटॅक येऊ शकतो. कित्येक तरुण आहेत, ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास असतो पण त्यांनी तपासणी केलेली नसते, त्यामुळे त्यांना आपल्याला हा त्रास आहे हे माहिती नसतं आणि असा अचानक हार्ट अटॅक येतो, असं डॉ. भोंडवे म्हणाले.

त्यामुळे सर्वांनी आपली वैद्यकीय तपासणी करावी आणि मगच गरबा खेळावा. किंबहुना गरबा आयोजक आहेत त्यांनीसुद्धा कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांसाठी वैद्यकीय तपासणी बंधनकारक केली तर उत्तम, असा सल्ला डॉ. भोंडवे यांनी दिला आहे.

First published: