मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Gold Coins खरेदी करताना काळजी घ्या; बनावट नाणी देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 25 जणांना अटक

Gold Coins खरेदी करताना काळजी घ्या; बनावट नाणी देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 25 जणांना अटक

Gold coins: सोन्याची बनावट नाणी देणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफास केला आहे. आरोपींकडून 31 लाख 79 हजारांचा मुद्देमाल जप्त.

Gold coins: सोन्याची बनावट नाणी देणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफास केला आहे. आरोपींकडून 31 लाख 79 हजारांचा मुद्देमाल जप्त.

Gold coins: सोन्याची बनावट नाणी देणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफास केला आहे. आरोपींकडून 31 लाख 79 हजारांचा मुद्देमाल जप्त.

    राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा, 6 मे: सोन्याचे दागिने (Gold ornaments) खरेदी करताना पैशांची समस्या नागरिकांना भेडसावत असते. यासाठी अनेक नागरिक हे सोन्याची नाणी (Gold coins) खरेदी करुन सोन्यात गुंतवणूक करत असतात. मात्र, याचाच फायदा घेत बनावट सोन्याची नाणी विकणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचं पहायला मिळत आहे. अशाच प्रकारे बनावट सोन्याची नाणी (Fake Gold coins) विकणाऱ्या टोळीचा बुलडाण्यातील खामगाव पोलिसांनी (Khamgaon Buldhana Police) पर्दाफाश केला आहे. सोन्याची नकली नाणी कमी किंमतीत देण्याचे आमिष देऊन सौदा ठरविणाऱ्या आणि सौद्यानंतर ग्राहकांना मारहाण करणाऱ्या एका टोळीचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. 15 लाखाच्या फसवणूक प्रकरणी परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर गुरूवारी पहाटे खामगाव उपविभागीय पोलीस पथकाने अंत्रज गावाजवळील वस्तीवर कोंबिंग ऑपरेशन राबविले आणि या टोळीचा पर्दाफाश केला आहे. खामगाव पोलिसांनी आरोपींकडून दोन देशी कट्ट्यांसह, इतर शस्त्रे आणि सोन्याची बनावट नाणी असा एकूण 31 लाख 79 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाचा: धक्कादायक! यवतमाळमध्ये प्रियकराच्या मदतीने रचला होणाऱ्या नवऱ्याच्या हत्येचा कट; असा उघड झाला प्रकार खामगाव तालुक्यातील अंत्रज येथे सोन्याची नकली नाणी देऊन गंडविणारी टोळी सक्रीय असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाला मिळाली. या संघटीत टोळीद्वारे राज्यातील अनेकांना गंडविण्यात आले. कमी किंमतीत नकली सोन्याची नाणी देण्याचा सौदा ठरवायचा. सौदा ठरल्यानंतर संबंधितांना अंत्रज शिवारात बोलवायचे. ग्राहकाकडील रक्कम आणि ऐवज लुटायचा अशी प्रॅक्टीस असलेल्या टोळीने 5 मे रोजी पुणे येथील एका व्यापाऱ्याची फसवणूक करून मारहाण केली तसेच पंधरा लाख रुपये घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी परिस्थितीजन्य पुरावे आणि माहितीच्या आधारे पोलिसांनी चिखली रोडवरील अंत्रज येथे कोंबिंग ऑपरेशन राबविले. या धडक कारवाईत टोळीतील 25 जणांना अटक करण्यात आली. यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता असून अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दोन देशी कट्टे, सोन्या चांदीचे दागिने, नकली सोन्याच्या गिन्या रोख रक्कम 26 लाख रुपये, 26 मोबाईल, देशी कट्टे, तलवारी, सुरे, भाले, कुऱ्हाड असा बराच मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खामगाव आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकराच्या अनेक गुन्ह्याचा छडा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Buldhana news, Gold

    पुढील बातम्या