राष्ट्रवादीला सोलापुरात धक्का, पक्षाची बैठक टाळून आमदाराने बोलावला कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा

राष्ट्रवादीला सोलापुरात धक्का, पक्षाची बैठक टाळून आमदाराने बोलावला कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

  • Share this:

सागर सुरवसे, सोलापूर, 17 ऑगस्ट : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बार्शीचे आमदार आणि ज्येष्ठ नेते दिलीप सोपल यांनी पक्षाच्या मुंबईतील बैठकीला दांडी मारली आहे. त्याचवेळी सोपल यांनी बार्शीत आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. या मेळाव्यानंतर दिलीप सोपल शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

बार्शीचे शिवसेनेचे माजी आमदार राजा राऊत भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांचा विचार ऐकून पक्षांतराबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती दिलीप सोपल यांनी 'News18 लोकमत'ला दिली आहे.

दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यास सोलापूरमध्ये राष्ट्रवादीला दुहेरी धक्का बसणार आहे. कारण राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवलेले संजयमामा शिंदे हे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. त्यामुळे या अडचणीवर राष्ट्रवादी कसा मार्ग काढणार, पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज मुंबईत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती आणि आगामी विधानसभा निवडणुका यावर चर्चा होणार आहे. तसंच ईव्हीएमचे विरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढला जाणार आहे. यासंदर्भातदेखील राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

डॉन आहे का तू? पोलिसांनी तरुणाला पट्ट्याने झोड-झोडपलं, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2019 03:37 PM IST

ताज्या बातम्या