मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पार्थ पवारांचा पराभव करणाऱ्या बारणेंनाच सोबत घेण्यासाठी सुप्रिया सुळे आग्रही! दिल्लीत काय घडलं?

पार्थ पवारांचा पराभव करणाऱ्या बारणेंनाच सोबत घेण्यासाठी सुप्रिया सुळे आग्रही! दिल्लीत काय घडलं?

पार्थ पवार, सुप्रिया सुळे

पार्थ पवार, सुप्रिया सुळे

मावळ लोकसभा मतदारसंघातून गेल्यावेळी निवडणुकीसाठी पार्थ पवार उभे होते. त्यांना या मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांचं आव्हान होतं. या निवडणुकीत श्रीरंग बारणे विजयी झाले होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ajay Deshpande

मुंबई, 9 डिसेंबर :  महाविकास आघाडीमधील बिघाडी पुन्हा एकदा समोर आली आहे. आज महाविकास आघाडीमधील खासदारांची महाराष्ट्र, कर्नाटक सीमा प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होती. या बैठकीला शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे आणि धैर्यशील माने यांनी देखील यावं यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रयत्न केला. मात्र सुप्रिया सुळे यांच्या या निर्णयाला ठाकरे गटाकडून जोरदार विरोध करण्यात आला.

या विरोधानंतर श्रीरंग बारणे आणि धौर्यशील माने यांना अमित शाह यांच्या दालनाबाहेरच थांबावे लागले. यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधील बिघाडी समोर आली आहे. मात्र यामध्ये सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती म्हणजे खासदार श्रीरंग बारणे यांच्या नावाची. कारण बारणे यांनी लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा पराभव केला होता.

हेही वाचा :  मोठी बातमी : महाविकास आघाडीमध्ये बिघाडी; सुप्रिया सुळे यांच्या 'त्या' निर्णयाविरोधात ठाकरे गट आक्रमक

पार्थ पवार यांचा पराभव  

मावळ लोकसभा मतदारसंघातून गेल्यावेळी  निवडणुकीसाठी पार्थ पवार उभे होते. त्यांना या मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांचं आव्हान होतं. पार्थ पवार उभे असल्यानं या मतदारसंघात राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र बारणे यांनी पार्थ पवार यांचा तब्बल 2.16 लाख मतांनी पराभव करत एक हाती सत्ता मिळवली, आणि आता याच श्रीरंग बारणे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला नेण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्याकडून प्रयत्न सुरू होता. त्यामुळे पुन्हा एकदा श्रीरंग बारणे हे चर्चेत आले आहेत.

हेही वाचा : '48 तासांचं अल्टिमेटम संपलं, कर्नाटकात गेलात का?' शिंदे गटाने शरद पवारांना डिवचलं

ठाकरे गटाचा विरोध 

सध्या महाराष्ट्र, कर्नाटक वादावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीमधील नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीसाठी शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे आणि धैर्यशील माने यांनी देखील यावं यासाठी सुप्रिया सुळे यांनी प्रयत्न केला. मात्र शिंदे गटाच्या खासदारांना ठाकरे गटाकडून विरोध करण्यात आला. त्यामुळे बारणे आणि माने यांना अमित शाह यांच्या दालनाबाहेरच थांबावे लागले.

First published:

Tags: Supriya sule