Home /News /maharashtra /

बारामतीतील RTI कार्यकर्त्याच्या अर्जानंतर मिळाली धक्कादायक माहिती

बारामतीतील RTI कार्यकर्त्याच्या अर्जानंतर मिळाली धक्कादायक माहिती

सध्या सरळसेवा भरतीतूनच शासनाला दीड लाख पदांची आवश्यकता आहे.

    बारामती,10 मार्च : राज्यात 70 हजार पदांची भरती होणार असल्याचे महाविकास आघाडी सरकार सांगत असले तरी प्रत्यक्षात राज्यात जिल्हा परिषदा आणि शासकीय खात्यांमध्ये मिळून आतापर्यंत तब्बल 2 लाख 193 पदे रिक्त आहेत. सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी ही माहिती मिळवली आहे. नितीन यादव यांनी राज्य सरकारकडे यासंदर्भात माहिती मागवली होती. त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार मंजूर असलेल्या शासकीय पदांपैकी 1 लाख 41 हजार 329 पदे ही सरळसेवा भरतीतील पदे आहेत, जी रिक्त आहेत. तर पदोन्नतीतून भरली जाणाऱ्या पदांची संख्या तब्बल 58 हजार 864 एवढी आहे. थोडक्यात सध्या सरळसेवा भरतीतूनच शासनाला दीड लाख पदांची आवश्यकता आहे. त्यामुळे येत्या काळात ही पदे भरली जाणार का याची उत्सुकता आहे. नितीन यादव यांनी शासनाकडे सर्व विभागांमध्ये मिळून 31 डिसेंबर 2019 अखेर मंजूर पदे, भरलेली पदे व रिक्त पदांची संख्या मागवली होती. हेही वाचा- बीड सहकारी बँकेत कर्जमाफीमध्ये कोट्यवधीचा घोटाळा, विनायक मेटेंचा आरोप 17 फेब्रुवारी 2020 रोजी ही माहिती त्यांनी ऑनलाईन मागवली होती. त्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाने आज नितीन यादव यांना दिली. यामध्ये 1 जानेवारी 2020 पासून भरलेली पदांची संख्या समाविष्ठ नाही, मात्र एकूणच शासनाच्या प्रत्येक कार्यालयात रिक्त असलेल्या पदांची संख्याही काही थोडी नाही, हे स्पष्ट झाले आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Baramati, State government

    पुढील बातम्या