बारामती, 11 मार्च : राज्यात कोरोनाची (Maharashtra Crorona Updates) परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये बेडची कमतरता जाणवत आहे. बारामतीमध्ये (Baramati) बेडच उपलब्ध नसल्यामुळे खुर्चीवरच उपचार केले जात असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
बारामतीत रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत, त्यामुळे अनेक रुग्णांना खुर्चीवर बसून उपचार सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ बारामतीयेथील शासकीय सिल्व्हर जुबली हॉस्पिटलमधील आहे. या व्हिडिओमध्ये डॉक्टर स्वतः रुग्णांना खुर्चीवर बसवून उपचार करताना पहायला मिळत आहेत.
बारामती तालुक्यात 644 बेड उपलब्ध आहेत. त्यातील फक्त 130 बेड हे शासकीय आहेत. त्यातील सिल्व्हर ज्युबली रुग्णालयात 92 बेडची क्षमता असताना सध्या रुग्णालयात 190 रुग्ण उपचार घेत आहेत.
खाजगी रुग्णालयात रेमडीसीवीर इंजेक्शन मिळत नसल्याने रूग्ण शासकीय रुग्णालयात गर्दी करत आहेत. त्यामुळे रुग्णांना हॉस्पिटलच्या मोकळ्या जागेत दाखल केल्याचं डॉक्टरांनी सांगितले.
जेव्हा ‘काशीबाई’ला 'मस्तानी'च्या रोलबद्दल विचारलं; प्रियंका चोप्राने दिलं उत्तर
सध्या बारामतीत 2200 पेक्षा जास्त ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या 10 दिवसांत 1900 पेक्षा जास्त रुग्ण बारामतीत तालुक्यात कोरोनाबाधित झाले आहे. त्यामुळे बारामतीतच नव्हे राज्यातील लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.