बारामतीत माळेगाव कारखान्यातील अपघाताचे कारण आले समोर, एका कामगाराचा मृत्यू

बारामतीत माळेगाव कारखान्यातील अपघाताचे कारण आले समोर, एका कामगाराचा मृत्यू

माळेगाव साखर कारखान्यात शनिवारी 23 मे रोजी 12 कामगारांनी टाकी साफ करण्याचे काम हाती घेतले होते

  • Share this:

बारामती, 24 मे : बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्यात  टाकी साफ करत असताना अपघात झाला होता. या दुर्घटनेत जखमी झालेल्या एका कामगाराचा मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. टाकीत मिथेन वायू तयार झाल्यामुळे हे बारा कामगार बेशुद्ध पडले होते.

सध्या साखर कारखान्यात हंगाम बंदची कामे सुरू आहेत.  त्यामुळे  माळेगाव साखर कारखान्यात  शनिवारी 23 मे रोजी 12  कामगारांनी पॅन टाकी साफ करण्याचे काम हाती घेतले होते. यामध्ये टाकी साफ करताना पाणी सोडले असता मिथेन गॅस तयार होऊन कामगार बेशुद्ध पडले.

बेशुद्ध पडलेल्या कामगारांना तातडीने बारामती येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.  उपचारादरम्यान, शनिवारी पहाटे 2.30 च्या सुमारास शिवाजी भोसले या कामगाराचा मृत्यू झाला.

हेही वाचा -आठवडाभरात महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढणार, या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी

तर पुणे येथे उपचार घेत असलेले कामगार घनश्याम निंबाळकर यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

इतर कामगारांवर उपचार सुरू आहे. यातील पाच कामगारांना आयसीयुमध्ये  दाखल करण्यात आले असून त्यांना धोका नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

 

हेही वाचा -मोठी बातमी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितली कोरोनाची नवी लक्षणं

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची दखल घेतली आहे. अजितदादांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन कामगारांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.

 संपादन - सचिन साळवे

First published: May 24, 2020, 4:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading