'ज्वारी बहरात, हुरडा पार्ट्या जोरात'; अशी साजरी होते बारामतीत 'हुरडा पार्टी'

'ज्वारी बहरात, हुरडा पार्ट्या जोरात'; अशी साजरी होते बारामतीत 'हुरडा पार्टी'

यंदा अवकाळी पावसामुळे ज्वारीचे पिक जोमदार आले आहे. त्यामुळं बारामतीसारख्या भागात मोठ्या प्रमाणात हुरडा पार्ट्या रंगताना दिसतायत.

  • Share this:

17 डिसेंबर : 'ज्वारी बहरात, हुरडा पार्ट्या जोरात' असं म्हणतं बारामती भागात हुरडा पार्टी रंगते. डिसेंबर महिन्यात शेतातील ज्वारी बहरात येवू लागते आणि त्याचाच आनंद म्हणून बारामतीत हुरडा पार्टी साजरी केली जाते.

ज्वाऱ्या फुलोऱ्यात आल्या की बळीराजा गोफण घेवून धानावरची पाखरं हाकायला तयार होतो. जोरजोरात हरोळ्या टाकून बळीराजा या पाखरांना हाकलण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतो. मात्र तरीदेखील काही पक्षी या फुलोऱ्यात आलेल्या ज्वारीचा आनंद घेतात, त्याच पद्धतीनं अनेक हौशी लोकही गरमागरम भाजलेल्या ज्वारीची मजा घेण्यासाठी थेट शिवारात येतात आणि हुरडा पार्टी साजरी करतात.

यंदा अवकाळी पावसामुळे ज्वारीचे पिक जोमदार आले आहे. त्यामुळं बारामतीसारख्या भागात मोठ्या प्रमाणात हुरडा पार्ट्या रंगताना दिसतायत.

या हुर्ड्या पार्टीची अजून एक खासियत म्हणजे चुलीवरचं जेवण. भाकरी, पिठलं, ठेचा, थालीपीठ, दही यासह विविध प्रकारच्या चटण्या यांनं ताट अगदी भरून गेलेलं असतं. अशा गावरान मेव्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकही तुटून पडतात. त्यामुळे यानिमित्ताने शेतकऱ्यांना व्यवसायही उपलब्ध झाला आहे.

पूर्वी नवीन वर्षाच्या स्वागताला अशा हुरडा पार्ट्यांचा निमित्ताने आपल्या पाहुण्या रावळे आणि मित्र मंडळी यांना घरी बोलावून त्यांचा पाहुणचार करण्याची परंपरा शेतकरी वर्गात होती. पण शहरी लोकांसाठी अशा हुरडा पार्ट्या म्हणजे थास आकर्षण असतं.

First published: December 17, 2017, 1:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading