बारामतीत काळीमा फासणारी घटना, 13 वर्षीय मुलीवर शाळेतील टॉयलेटमध्ये बलात्कार

बारामतीत काळीमा फासणारी घटना, 13 वर्षीय मुलीवर शाळेतील टॉयलेटमध्ये बलात्कार

शाळेतीलच मुलाने टॉयलेटमध्ये विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

  • Share this:

बारामती, 3 मे : बारामतील शहरात एका विद्यालयात 13 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. नामांकित विद्यालयात विद्यार्थिनीवर स्वच्छतागृहात बलात्कार केल्याची घटना घडली असून शाळेतीलच मुलाने टॉयलेटमध्ये विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर शाळेतीलच दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांविरोधात शहर पोलिसांनी बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, ही घटना काही महिने आधी घडली आहे. परंतु पीडित मुलीने यासंबंधी आता फिर्याद दिली आहे. पिडीत मुलगी बारामतीतच राहते. शहरातील एका नामांकित संस्थेच्या विद्यालयात ती शिक्षण घेत आहे. दोन्ही आरोपी मुले ही पिडीतेच्या तोंडओळखीची आहेत. ती नववीत किंवा दहावीत शिकत असावीत, असा अंदाज फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे.

या दोघांपैकी उंचीने कमी असणाऱ्या मुलाने घटनेदिवशी शाळेच्या संरक्षक भिंतीलगत असलेल्या स्वच्छतागृहात तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या उंचीने मोठ्या असलेल्या मुलाने त्याला या कामी मदत केली, असं फिर्यादीमद्ये म्हटलं आहे. पोलिसांनी  आरोपींना अद्याप ताब्यात घेतलेलं नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे याचा तपास  करीत आहेत.

VIDEO: काही वेळात धडकणार फानी चक्रीवादळ, संपूर्ण राज्यात हाय अलर्ट

First published: May 3, 2019, 8:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading