मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'बाप बापच असतो', रामदास कदमांसाठी ठाण्यात बॅनरबाजी, शिवसेनेचाच टाळला उल्लेख!

'बाप बापच असतो', रामदास कदमांसाठी ठाण्यात बॅनरबाजी, शिवसेनेचाच टाळला उल्लेख!

 ‘कालपर्यंत राडा झाल्यावर आम्हाला फोन करणारे लोक... आज आमचीच सुपारी द्यायला निघाले आहेत. त्यांना पुन्हा एकदा आठवण करुन देतो'

‘कालपर्यंत राडा झाल्यावर आम्हाला फोन करणारे लोक... आज आमचीच सुपारी द्यायला निघाले आहेत. त्यांना पुन्हा एकदा आठवण करुन देतो'

‘कालपर्यंत राडा झाल्यावर आम्हाला फोन करणारे लोक... आज आमचीच सुपारी द्यायला निघाले आहेत. त्यांना पुन्हा एकदा आठवण करुन देतो'

  • Published by:  sachin Salve
ठाणे, 17 ऑक्टोबर : भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somiya)  यांना रसद पुरवण्याबद्दल ऑडिओ क्लिप (ramdas kadam audio clip) व्हायरल झाल्यामुळे शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (ramdas kadam) वादात अडकले आहे. तर दुसरीकडे रामदास कदम यांच्या समर्थनार्थ ठाण्यामध्ये (thane) बॅनरबाजी करण्यात आली आहे. पण, या बॅनरवरून शिवसेनेचा (shivsena) उल्लेख टाळण्यात आल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. ठाण्यातील नितीन कंपनीच्या चौकात रामदास कदम यांचा फोटो असलेले बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरवर रामदास कदम यांचा फोटो लावण्यात आला आहे. या बॅनरवर स्थानिक शिवसेना नेत्यांचे फोटो आहे. पण शिवसेनेचा उल्लेख टाळण्यात आला आहे, असं वृत्त टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीने दिलं आहे. Bigg Boss फेम या अभिनेत्रीला गंभीर दुखापत, चालणंही झालंय कठीण तर ‘कालपर्यंत राडा झाल्यावर आम्हाला फोन करणारे लोक... आज आमचीच सुपारी द्यायला निघाले आहेत. त्यांना पुन्हा एकदा आठवण करुन देतो बाप बापच असतो…’ असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे. या मजकुरामधून कदम यांच्या समर्थकांनी कुणाला इशारा दिला अशी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, रामदास कदम यांनी किरीट सोमय्यांना मदत केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी कदम यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. एवढंच नाहीतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाराजीही कदम यांनी ओढावून घेतली. त्यामुळेच रामदास कदम हे दोन दिवसांपूर्वी झालेल्या दसरा मेळाव्याला हजर राहिले नाही. Team India चा कोच होण्यासाठी पूर्ण कराव्या लागणार या अटी, BCCI ने दिली जाहिरात खुद्द रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून दसरा मेळाव्यास तब्येतीच्या कारणास्तव येत नसल्याचं कळवलं होतं. गेले ३ महिने रामदास कदम आजारी आहेत. त्यांना डॉक्टरांनी गर्दीत न जाण्याचं आणि विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे रामदास कदम दसऱ्या मेळाव्यास उपस्थित राहिले नाहीत. गेले काही दिवस रामदास कदम यांच्या आवाजाची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. ज्यात ते भाजप नेते किरीट सोमय्या यांना परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधातील पुरावे देण्यासंदर्भात खेड मधील स्थानिक कार्यकर्त्यांशी फोन वरून संवाद साधत आहेत. त्यामुळे शिवसेनेत मोठं वादळ निर्माण झालं होतं.
First published:

पुढील बातम्या