'आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल'; बारामतीमधील पोस्टर्सची राज्यभर चर्चा!

'आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल'; बारामतीमधील पोस्टर्सची राज्यभर चर्चा!

अजित पवारांच्या विजयावर पोस्टरबाजी सुरु झाली आहे.

  • Share this:

बारामती, 29 ऑक्टोबर: राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता सत्तास्थापनेची तयारी सुरु झाली आहे. निवडणुकीच्या निकालात विरोधी पक्षांनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आणि महायुतीची वाट रोखली. निवडणुकीच्या निकालात सर्वाधिक चर्चा झाली ती बारामतीमधील राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार यांच्या विजयाची. निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार राजीनाम्याच्या नाट्यामुळे चर्चेत आले होते. भाजपने देखील अजित पवारांच्या पराभवासाठी जोरदार प्रयत्न केले होते. पण निकालात अजित पवार यांनी तब्बल 1 लाख 65 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला. अजित पवारांचा हा फक्त मोठा विजय नव्हता तर त्यांच्या विरोधात असलेल्या सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली. आता अजित पवारांच्या या विजयावर पोस्टरबाजी सुरु झाली आहे.

बारामतीमध्ये 'आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल' अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. अजित पवार यांचे पुन्हा आमदारपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणारे पोस्टर बारामतीमध्ये लागले आहेत. पण या शुभेच्छा देताना त्यातील 'आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल', हे मजकूर चर्चेत आला आहे. बारामतीमधील हे पोस्टर आता व्हायरल होत आहेत आणि या पोस्टरची चर्चा राज्यभर होत आहे. अजित पवार यांनी मिळवलेल्या या विक्रमी विजयानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे हटकेपद्धतीने अभिनंदन केले आहे. पवारांनी भाजपचे उमेदवार गोपीनाथ पडळकर यांच्यासह सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त केले. विशेष म्हणजे पडळकर यांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी ढाण्या वाघ असा केला होता.

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते संपर्काबाहेर केले होते. त्यामुळे अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. अजित पवार कुठे गेले याची माहिती खुद्द शरद पवार यांना देखील नव्हती. त्यानंतर शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट झाली होती. निवडणुकीच्या आधी पवार कुटुंबात ठिक नसल्याची चर्चा होती. पण प्रचारात शरद पवार यांनी राज्यभर सभा घेत निकालाचे चित्र बदलले होते.

'ठरलं ते झालं नाही तर...',युतीसंदर्भात संजय राऊत यांचं मोठं विधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 29, 2019 02:04 PM IST

ताज्या बातम्या