पीक कर्ज देण्यासाठी बँकांची टोलवाटोलवी, पावसाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पेरणीची चिंता

पीक कर्ज देण्यासाठी बँकांची टोलवाटोलवी, पावसाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पेरणीची चिंता

एकाही शेतकऱ्याला कर्ज देताना अडवणूक करू नका, असे आदेश सरकारने दिले असले तरी प्रत्यक्ष मात्र स्थिती वेगळीच आहे

  • Share this:

बीड, 2 जून : शेतातील पेरणी जवळ आली मात्र यंदा पीक कर्ज मिळत नसल्याने शेती कशी करावी अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. बँकेच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. कर्ज मिळालं तर पेरणी करता येईल, अन्यथा खते, बी-बियाणे आणायचे कुठून? असा सवाल शेतकरी करत आहेत.

बँकेच्या उदासीन धोरणाचा फटका जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना बसत आहे. यातच राष्ट्रीयकृत बँकांमध्ये लॉकडाऊनमुळे कर्मचारी कमीचे कारण पुढे करत चालढकल केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज थकवले नाही त्यांना देखील बँकेच्या दारात चकरा माराव्या लागत असल्याची स्थिती आहे. आता पेरणीसाठी बी बियाणे आणि खत घेण्यासाठी बँकेच्या दारात चकरा मारणारा लागत असल्याचं शेतकरी उद्धव वाघमारे यांनी सांगितलं

एकाही शेतकऱ्याला कर्ज देताना अडवणूक करू नका, असे आदेश सरकारने दिले असले तरी प्रत्यक्ष मात्र स्थिती वेगळीच आहे. स्थनिक जिल्हा प्रशासनाने सांगून देखील बँकाच्या उदासीन धोरणामुळे पीक कर्ज वाटप केले जात नाही.

सरकार रोज नवे आदेश देत आहे. मात्र बँका ऐकत नाहीत यात हजारो कोटी रुपये बुडवून उद्योगपाती पळून जातात. मात्र शेतकाऱ्याला कर्ज भरून देखील पुन्हा कर्ज मिळत नाही. ही शोकांतिका आहे, अशा भावना आता शेतकरी वर्ग मांडत आहे. दरम्यान याप्रकरणी बँक अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.

First published: June 2, 2020, 6:23 PM IST

ताज्या बातम्या