अजित पवारांसह अनेक नेत्यांच्या अडचणी वाढणार? बँक घोटाळ्याप्रकरणी 5 दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

अजित पवारांसह अनेक नेत्यांच्या अडचणी वाढणार? बँक घोटाळ्याप्रकरणी 5 दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

अनेक बड्या नेत्यांचा 25 हजार कोटींच्या कर्जवाटपात झालेल्या घोटाळ्यामध्ये समावेश असल्याचा याचिकेत आरोप करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 22 ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी पाच दिवसांत गुन्हा दाखल करा असे आदेश मुंबई हायकोर्टानं EOW ला दिले आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ, मधुकर चव्हाण, आनंदराव अडसूळ यांच्यासह इतर बड्या नेत्यांचा 25 हजार कोटींच्या कर्जवाटपात झालेल्या घोटाळ्यामध्ये समावेश असल्याचा याचिकेत आरोप करण्यात आला आहे.

बँक घोटाळ्याबाबत सुरिंदर अरोरा यांनी जनहित याचिका दाखल केली होती. या बँकेत अजित पवार आणि जयंत पाटील हे संचालक होते. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी अरोरा यांची मागणी आहे. संबंधित बँकेमध्ये बँकेचे नियम आणि आरबीआयच्या निर्देशांची पायमल्ली करून साखर गिरण्या, सूत गिरण्यांना कर्ज वाटप करण्यात आल्याचा ठपका नाबार्डनं ठेवला होता. 2005 ते 2010 मध्ये झालेल्या या प्रकरणांमध्ये कर्जवसुली चुकवण्यात आल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे. गेल्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने एफआयआर दाखल न केल्याप्रकरणी सरकारला खडसावलं होतं.

काय आहे राज्य सहकारी बँकेचा घोटाळ्याचा आरोप?

- 2005 ते 2010 या कालावधीत राज्य सहकारी बँकेवर वर्चस्व असणाऱ्या संचालक मंडळांनी नियमबाह्य कर्जाचे वितरण केलं.

- राज्यातल्या अनेक सहकारी साखर कारखाने सूतगिरणी मिल यासह अनेक सहकारी संस्थांना कर्जाचं वाटप केलं गेलं.

- हे सर्व कर्ज नियमबाह्य पद्धतीने दिले गेले. साधारण त्याची रक्कम पंधराशे कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

- अजित पवारांचे निकटवर्तीय राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव पाटील राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना बहुतेक कर्ज दिले गेले. यावरून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली.

- राज्य सहकारी बँकेला या सर्व प्रकरणामुळे आर्थिक नुकसान तर झालेच पण स्वतःच्या सहकारी संस्थांसाठी नियमबाह्य कर्ज देत मोठ्या प्रमाणात फायदा मिळवल्याचा आरोप या याचिकेत केला गेला आहे.

मुलाच्या अंगावरून गाडी गेली पण खरचटलंही नाही, श्वास रोखून धरायला लावणारा VIDEO समोर

Published by: Akshay Shitole
First published: August 22, 2019, 4:39 PM IST
Tags: ajit pawar

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading