बँक घोटाळा प्रकरण: अटकपूर्व जामिनासाठी अजित पवारांची सुप्रीम कोर्टात धाव

काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुका आणि राजकीय वातावरण या पार्श्वभूमीवर अटकेची कारवाई झालीच तर संरक्षण मिळावं यासाठी हा प्रयत्न आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 27, 2019 06:51 PM IST

बँक घोटाळा प्रकरण: अटकपूर्व जामिनासाठी अजित पवारांची सुप्रीम कोर्टात धाव

मुंबई 26 ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांसह सर्व माजी संचालकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. गुन्हा दाखल झाल्यानंतर आता अटकपूर्व जामिनासाठी सर्वच नेत्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुका आणि राजकीय वातावरण या पार्श्वभूमीवर अटकेची कारवाई झालीच तर संरक्षण मिळावं यासाठी हा प्रयत्न असल्याचं बोललं जातं.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 31 बँक संचालकांविरुद्ध पोलिसांनी सोमवारी गुन्हे दाखल केले होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी याबाबत मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावरून कोर्टाने काही दिवसांपूर्वीच गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाच्या आदेशानंतर आज गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आल्याने अजित पवार अडचणीत सापडले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने त्याचा फटका राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे.

शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर पहिल्यांदाच काय बोलले छगन भुजबळ?

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने अत्यंत मनमानी पद्धतीने कर्जवाटप केलं होतं. या कर्जवाटपामुळे बँकेला 10 हजार कोटींचा फटका बसला होता. या घोटाळ्याप्रकरणी अण्णांनी तीन वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती. नंतर त्यावर चौकशी समितीही नेमली गेली होती. त्याच्या अहवालनंतर कोर्टानं गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत.

काँग्रेसचा हा बंडखोर नेता करणार मुख्यमंत्र्यांच्या यात्रेचं दणक्यात स्वागत!

Loading...

दोनच दिवसांपूर्वी या प्रकरणावर अजित पवारांनी प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळले होते. अजित पवार म्हणाले, 'कोर्टाने 75 लोकांबाबतीत निकाल दिला आहे. त्या बँकेच्या एकाही लोन कमेटीला आणि एक्झिक्युटिव्ह कमेटीला मी हजर नव्हतो. 75 लोकांपैकी भाजपचे हयात नसलेले मंत्री भाऊसाहेब फुंडकर देखील होते. शिवसेनेचे केंद्रातील माजी अर्थमंत्री यांचाही त्यात समावेश आहे. पण मीडिया मात्र फक्त अजित पवार अजित पवार करत आहे. काय माझ्याबद्दल त्यांना एवढे प्रेम आहे. या बँक प्रकरणात मी एक रुपयात सुध्दा मिंधा नाही हे जाहीर भाषणात सांगतो,' असं म्हणत अजित पवारांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते.

काय आहे राज्य सहकारी बँकेचा घोटाळ्याचा आरोप?

- 2005 ते 2010 या कालावधीत राज्य सहकारी बँकेवर वर्चस्व असणाऱ्या संचालक मंडळांनी नियमबाह्य कर्जाचे वितरण केलं.

- राज्यातल्या अनेक सहकारी साखर कारखाने सूतगिरणी मिल यासह अनेक सहकारी संस्थांना कर्जाचं वाटप केलं गेलं.

- हे सर्व कर्ज नियमबाह्य पद्धतीने दिले गेले. साधारण त्याची रक्कम पंधराशे कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

- अजित पवारांचे निकटवर्तीय राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव पाटील राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना बहुतेक कर्ज दिले गेले. यावरून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली.

- राज्य सहकारी बँकेला या सर्व प्रकरणामुळे आर्थिक नुकसान तर झालेच पण स्वतःच्या सहकारी संस्थांसाठी नियमबाह्य कर्ज देत मोठ्या प्रमाणात फायदा मिळवल्याचा आरोप या याचिकेत केला गेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 06:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...