यवतमाळ, 05 मार्च : शेतकरी महिलेकडे बँक कर्मचाऱ्याने शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये समोर आला आहे. शेतीसाठी घेतलेल्या ट्रॅक्टरच्या कर्जाचे हफ्ते थकल्याने वसुलीसाठी गेलेल्या बँक कर्मचाऱ्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. सगळ्यात धक्कादायक म्हणजे या प्रकरणाची तक्रार नोंदवण्यासाठी पीडित महिला गेली असता पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यासाठी स्पष्ट नकार दिला.
घाटंजीच्या मोवाडा इथे हा प्रकार आहे. याची तक्रार नोंदवण्यासाठी पीडित महिला घाटंजी पोलीस स्थानकात गेली होती. पण तिथल्या पोलिसांनी टाळाटाळ केली. त्यानंतर महिलेने थेट पोलीस अधिक्षकांकडून तक्रार नोंदवली. आरोपी बँक कर्मचाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
हे वाचा - रतनलाल यांच्यावर हल्ला झाल्याचा VIDEO आला समोर, दिल्ली हिंसाचाराचं भयानक दृष्य
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने इंडसइंड बँकेकडून ट्रक विकत घेण्यासाठी कर्ज घेतलं होतं. त्या कर्जाचे पहिले दोन हफ्ते फेडण्यात आले पण तीसरा हफ्ता थकला. त्यामुळे बँकेने वसुलीसाठी कर्मचाऱ्याला महिलेच्या घरी पाठवले. तिथे पैसे नसल्याचं सांगितल्यानंतर आरोपी सुरज गजभिये याने पीडितेकडे शरीरसुखाची मागणी केली.
यावर महिलेने विरोध केला आणि मोठ्याने आरडाओरड करण्यास सुरूवात केली. शेजारुन कोणी धावत येण्याच्या आतच बँक कर्मचाऱ्याने पळ काढला. यांतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. या सगळ्याचा पोलीस कसून तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहे. दरम्यान, शेतकऱ्याच्या लेकीचा आणि गरीबीचा अशा प्रकारे फायदा घेणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वसामान्यांकडून करण्यात येत आहे.
हे वाचा - दाभोलकरांच्या हत्या प्रकरणात नवं वळण, तब्बल 7 वर्षांनंतर समोर आला मोठा पुरावा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.