बँकांचा आज संप, सलग तिसऱ्या दिवशी कामकाज राहणार बंद

बँकांचा आज संप, सलग तिसऱ्या दिवशी कामकाज राहणार बंद

रविवारनंतर सोमवारी मतदानाची सुटी आणि मंगळवारी संप यामुळे सलग तिसऱ्या दिवशी राज्यातील बँका बंद राहणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 22 ऑक्टोबर : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलिनिकरण विरोधात बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे. मंगळवारी हा संप करण्यात येत असून व्यापारी बँकांच्या घसरणाऱ्या ठेवी दरांविरुद्धही निदर्शन केलं जाणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून बंद असलेल्या राज्यातील बँका सलग तिसऱ्या दिवशीही बंद राहणार आहेत. यामुळे खातेदार, ठेवीदार आणि ग्राहकांचे हाल होणार आहे.

राज्यात सोमवारी विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. त्यामुळे बँकांना सुटी देण्यात आली होती. त्याच्या आधी रविवारची सुटी होती. दोन दिवसांच्या सुटीनंतर मंगळवारी संपामुळे बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.

खूशखबर : धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, हे आहेत नवे दर

रिझर्व्ह बँक, स्टेट बँक, ग्रामीण बँका, खासगी व सहकारी बँकेतील कर्मचारी व अधिकारी या संपात सहभागी होणार नाहीत. गेल्या महिन्यातही अशा प्रकारचा संप पुकारण्यात आला होता. मात्र, गेल्या महिन्यातही सलग सुट्यांमुळे ग्राहकांना त्रास होऊ नये यासाठी संपु पुढे ढकलण्यात आला होता.

वाचा : SBI च्या कोट्यवधी ग्राहकांना धक्का, 1 नोव्हेंबरपासून होणार हा बदल

वाचा : PMC बँकेसारखा धोका टाळायचा असेल तर पैसे गुंतवण्यासाठी हे आहेत सुरक्षित पर्याय

VIDEO: पुण्यात निकालाआधीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयाचे डोहाळे

First published: October 22, 2019, 8:53 AM IST
Tags: rbi

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading