2 किलो सोनं विकायचंय, पैसे घेऊन या; असं सांगून 2 बॅंक अधिकाऱ्यांना लुटलं

2 किलो सोनं विकायचंय, पैसे घेऊन या; असं सांगून 2 बॅंक अधिकाऱ्यांना लुटलं

सोन्याची लालसा बॅंक अधिकाऱ्यांना पडली महागात.... वाचा काय आहे प्रकरण

  • Share this:

खेड,(रत्नागिरी), 16 सप्टेंबर: आमच्याकडे 2 किलो सोनं आहे. पैसे घेऊन या, असं सांगून 10 ते 12 जणांच्या टोळीनं दोन बॅंक अधिकाऱ्यांना लाखो रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी बॅंक अधिकऱ्यांकडून सुमारे 59 लाख रुपये चोरून पोबारा केला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर खवटी गावानजीक कामाक्षी पेट्रोल पंपाजवळ बुधवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. या प्रकरणी खेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा...लघुशंकेला रस्त्याच्या कडेला थांबताच झाला घात... पुणे जिल्ह्यातील घटना

मिळालेली माहिती अशी की, मुंबई-गोवा महामार्गावर खवटी गावानजीक कामाक्षी पेट्रोल पंपाजवळ खेड येथील दोन बॅंक अधिकाऱ्यांनी लुटल्याची घटना घडली. यात एक पतसंस्था आणि एक राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आमच्याकडे 2 किलो सोनं असून ते आम्हाला विकायचं आहे. येताना पैसे घेऊन या, असा फोन बॅंक अधिकाऱ्यांना आला होता. त्यानुसार दोन्ही बॅंक अधिकारी मुंबई-गोवा महामार्गावर खवटी गावाजवळीत कामाक्षी पेट्रोल पंपाजवळ पोहोचले होते. मात्र, तिथे दबा धरून बसलेल्या अज्ञात 10 ते 12 जणांच्या टोळीने दोन्ही बँक अधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्याकडे असलेले 59 लाख रुपयांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले आहेत. नंतर दोन्ही पीडित बॅंक अधिकाऱ्यांनी खेड पोलीस स्टेशन गाठून आपबिती सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे.

लघुशंकेला रस्त्याच्या कडेला थांबला, तितक्यात....

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील दौंड येथे अशीच घटना घडली होती. रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या टेम्पो ड्रायव्हरकडून 29 लाख रुपये चोरट्यांनी पळवले होते. मात्र, दौंड पोलिसांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापरू करून पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर 29 लाखांचा झालेला सिनेस्टाईल दरोडा उघड केला आहे. पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये पोलिसांनी ग्रामसुरक्षा यंत्रणा वापरून दरोड्यातील आरोपींना पकडण्यात यश आले आहे.

29 ऑगस्टला महामार्गावर दुचाकी गाड्यावर येऊन रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या टेम्पो ड्रायव्हरकडून 29 लाख रुपये चोरट्यांनी पळवले होते. त्यानंतर दौंड पोलिसांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेला चोरीचा संदेश दिला असता त्याच दिवशी ग्रामसुरक्षामुळे एका आरोपीस अटक करण्यास मदत झाली होती. यानंतर या घटनेचे गांभीर्य ओळखत अधिक तपास करीत गुन्ह्यातील 5 जणांची टोळी अटक करण्यात आली आहे. तर एकाच नंबरच्या 2 पल्सर तर नंबर नसलेली एक दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

मिळालेली माहिती अशी की, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मळद गावच्या हद्दीत पुण्याहून सोलापुरच्या दिशेने पोल्ट्रीचे खाद्य आणण्यासाठी निघालेल्या टेम्पोचा ड्रायव्हर लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबला होता. तितक्यात हत्यारबंद चोरट्यांनी दुचाकी गाड्यावर येऊन चालकास लुटून त्याच्याकडील 29 लाखांची रोकड लुटून पळ काढला होता. ही बाब दौंड पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांना समजताच त्यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेला चोरीचा संदेश दिला. या संदेशव्दारे ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत एकाच वेळी 60 हजार लोकांपर्यंत पोहोचला.

हेही वाचा...पुण्यात कोविड सेंटरवर राडा, स्वॅब घेतलेले सॅम्पल जमिनीवर फेकले...पाहा VIDEO

पाटस टोल नाकाकडून बारामती मार्गाकडे जाणाऱ्या एका नागरिकानी हा संदेश ऐकला. संदेशात ऐकल्याप्रमाणे त्याच वर्णनाची मोटारसायकल दिसल्याने तिचा पाठलाग केला असता अंधाराचा फायदा घेत दरोडेखोरांनी मोटारसायकल तिथेच सोडून शेजराच्या शेतात पळ काढला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच जागेवर पाहणी केली असता याठिकाणी 8 लाख 28 हजार इतकी रक्कम बॅगेमध्ये मिळाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी अधिक तपास केला असता पाटस पोलिसांनी एक आणि नंतर चार आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलं.

Published by: Sandip Parolekar
First published: September 16, 2020, 9:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading