सोलापूर: बँक ऑफ महाराष्ट्रच्या इमारतीचा स्लॅब कोसळला, खातेदारांसह 30 जण अडकल्याची भीती

स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच मोठं बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. 10 ते 15 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढत नजिकच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2019 01:32 PM IST

सोलापूर: बँक ऑफ महाराष्ट्रच्या इमारतीचा स्लॅब कोसळला, खातेदारांसह 30 जण अडकल्याची भीती

सोलापूरमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या बँकेचा स्लॅब कोसळला असल्याची माहिती देण्यात आली आहे. करमाळ्यामध्ये असलेल्या या बँकेचा स्लॅब कोसळला. तासाभराआधी ही दुर्घटना घडली आहे.

सकाळच्या वेळी खातेदारांची बँकेत मोठी गर्दी होती. त्यात अचानक स्लॅब कोसळल्याने यामध्ये तब्बल 25 ते 30 जण अडकल्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

स्लॅब कोसळ्याची माहिती मिळताच मोठं बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. 10 ते 15 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढत नजिकच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

सकाळची वेळ असल्यामुळे बँकेमध्ये खातेदारांची गर्दी होती. त्यामुळे खातेदारांसह, बँकेचे कर्मचारीही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती देण्यात आली आहे. जेसीबीच्या मदतीने कोसळलेला स्लॅब बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.

दरम्यान, घटना घडताच स्थानिकांनी मोठी गर्दी केली आहे. प्रशासनाकडून बचावकार्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

Loading...

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांना आणि खातेदारांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. तर परिसरात घटनेमुळे मोठी गर्दी झाली आहे.

इमारतीचा संपूर्ण स्लॅब खाली कोसळल्यामुळे जेसीबीच्या मदतीने माती बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे.

बचावकार्य सुरू असल्यामुळे स्लॅब नेमका कसा आणि का कोसळला यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2019 12:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...