पुणे, 28 जानेवारी : धर्मांतर, घरवापसी हे प्रश्न देशाच्या राजकारणात गाजत असताना बंजारा समाजाच्या महाकुंभमध्येही त्याचे पडसाद उमटले आहेत. आठ राज्यातील 11 हजार तांड्यांवर प्रत्यक्ष संपर्क केल्यानंतर त्यामधील 3 हजार तांड्यांमध्ये बंजारा समाजाचे धर्मांतर सुरू असल्याचा धक्कादायक दावा संत बाबूसिंगजी महाराज यांनी केला आहे. जामनेर तालुक्यातील गोद्रीमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमध्ये ते बोलत होते.
अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना नायकडा समाजाचा महाकुंभ सध्या गोद्रीमध्ये सुरू आहे. त्यावेळी बाबूसिंगजी बोलत होते. धर्मांतर झालेल्या सर्व बांधवांना आम्ही पुन्हा सनातन धर्मात परत आणणार आहोत. या समाजाला जागृत करण्यासाठी आणि पुढील दिशा देण्यासाठी हा कुंभ आयोजित केल्याचं त्यांनी सांगितलं.
गाभाऱ्यापासून ते तटबंदीपर्यंत, अयोध्येतील राम मंदिरासाठी वापरला जाणारा प्रत्येक दगड आहे अद्वितीय
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्मजागरण समितीचे प्रमुख शरद ढोले देखील यावेळी उपस्थित होते. देशाचे वैभव पाहून परकीय आक्रमणं झाली. ईशान्य भारतामध्येही धर्मांतराची मोहीम सुरू आहे. हे धर्मांतर पूजा पद्धतीपुरते मर्यादीत नाही. वेगळे राज्य आणि वेगळ्या देशाच्या मागणीनं ते सुरू झाले. बंजारा समाजाचे धर्मांतर होऊ नये यासाठी तसंच धर्मांतर थांबवण्यासाठी इथं शेकडो संत आले आहेत,' असे त्यांनी स्पष्ट केले.
माऊलींच्या अश्वाचे सोलापुरात गोल रिंगण, वारकऱ्यांनी दिला महत्त्वाचा संदेश, Video
राजकीय स्वार्थासाठी लक्ष्य
बंजारा महाकुंभमध्ये मांडलेल्या विषयाचे पडसाद उमरटण्यास सुरूवात झाली आहे. राजकीय स्वार्थापोटी फायदा उचलण्यासाठी पुन्हा एकदा धर्मांतराच्या मुद्याला मोठं केलं जात आहे. बंजारा समाज सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे. या प्रकारची संस्कृती टिकली पाहिजे. बंजारा समाज हा पर्यावरणावर प्रेम करणारा शांतताप्रिय समाज आहे. त्यांची माथी भडकवली की राजकारण सोपे होईल असे वाटणारे राजकारणी चुकीचे आहेत,' अशी टीका सामाजिक कार्यकर्ते आणि अॅडव्होकेट असिम सरोदे यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.