मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उदयनराजेंच्या 'त्या' वक्तव्यावरून बंजारा समाजाच्या नेत्यानं केली जहरी टीका

उदयनराजेंच्या 'त्या' वक्तव्यावरून बंजारा समाजाच्या नेत्यानं केली जहरी टीका

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेलं वक्तव्य हे लोकशाहीची थट्टा करणारं....

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेलं वक्तव्य हे लोकशाहीची थट्टा करणारं....

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेलं वक्तव्य हे लोकशाहीची थट्टा करणारं....

यवतमाळ, 29 सप्टेंबर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेलं वक्तव्य हे लोकशाहीची थट्टा करणारं आहे. एवढंच नाही तर उदयनराजे यांचे वक्तव्य देशात पुन्हा राजेशाही आणणारं असल्याची जहरी टीका बंजारा समाजाचे नेते, माजी आमदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे.

हेही वाचा..दोन्ही छत्रपती भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेत, शरद पवारांनी लगावला सणसणीत टोला

उदयनराजे यांच्या वक्तव्याचा माजी आमदार राठोड यांनी निषेध केला आहे. एका व्हिडियो संदेशाद्वारे राठोड यांनी उदयनराजेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर सर्वच प्रवर्गातील आरक्षण रद्द करा, असं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतंच केलं आहे. मात्र, उदयनराजे यांचं हे वक्तव्य म्हणजे या देशात पुन्हा राजेशाही पद्धत येतेय का? अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले होते उदयनराजे भोसले?

सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी सरकारविरोधात एल्गार पाहायला मिळत आहे. तर राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. आरक्षणावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मोठं विधान केलं आहे. 'मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळ्याच समाजाचं आरक्षण रद्द करा. गुणवत्तेनुसार, मेरिटवर सर्वांची निवड करा', अशी मागणी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

पुण्यात 3 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षण प्रश्नावर विचारमंथन बैठक होणार आहे. या बैठकीचे निमंत्रण घेऊन शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी साताऱ्यात गेले होते. विनायक मेटे यांनी उदयनराजे यांची भेट घेतली. या भेटीनंतर खासदार उदयनराजे यांनी मराठा आरक्षणाच्यामुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला.

मराठा समाजाची आर्थिक स्थिती बिकट..

उदयनराजे यांनी सांगितलं की, मराठा समाजाची आर्थिक स्थिती बिकट आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर समाजात प्रचंड रोष आहे. इतक समाजाला ज्या पद्धतीनं आरक्षण मिळालं, त्याच पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनही अ‍ॅडमिशन मिळत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर सगळेच आरक्षण रद्द करा. मेरिटवर सर्वांची निवड करा,' असे उदयनराजे म्हणाले. इतर समाजात कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.

देवानं प्रत्येकाला बुद्धी दिली आहे त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिज. अभ्यास करुन चांगले गुण असूनही अ‍ॅडमिशन न मिळाल्यामुळे मराठा समाजातील अनेक मुलांना नैराश्य येत आहे. यापूर्वीही मी म्हणालो होतो सर्व आरक्षण रद्द करुन आर्थिक निकषावर आरक्षण द्या, मात्र तसे झाले नाही,' अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी यावेळी दिली आहे.

सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्या एकत्र...

दरम्यान, नाशिकमध्ये काल मराठा समाजाची राज्यस्तरिय बैठक झाली. या बैठकीला खासदार संभाजीराजे भोसले उपस्थीत होते. सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्या आता एकत्र आल्या आहेत. त्यामुळे उगाच भांडणं लावणाऱ्यांना ठोका, असा आदेशच खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या समर्थकांना दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे. आहेत.

सर्व मराठा संघटना एकत्र या, आपली ताकद काय आहे ते दाखवून देऊ. सर्व प्रकारच्या जबाबदारी निश्चित ठरवू, समाजातील सर्व विद्वानांना एकत्र करू आणि वेगवेगळ्या प्रेशर टाकणाऱ्या समिती तयार करू, असंही संभाजी राजे यांनी यावेळी सांगितलं. मराठा आंदोलकांनी भावनिक होऊ नका, काही गोष्टी गनिमी काव्यानं करायच्या असतात, असं आवाहन देखील संभाजीराजे छत्रपती यांनी नाशिक येथील मराठा आंदोलनाच्या राज्यस्तरिय बैठकीत दिला.

हेही वाचा...यंदा गरबा-दाांडिया नाहीच! नवरात्रौत्सव संदर्भात सरकारनं जाहीर केली गाईडलाईन

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी ही नाशिक येथे राज्यस्तरीय बैठक आयोजन करण्यात आलं होतं. राज्यातील सर्व मराठा संघटना एकाच छताखाली एकत्र आल्या होत्या. खासदार उदयनराजे भोसले यांचे प्रतिनिधी म्हणून यशराजे पाटील तर राज्यातील 22 जिल्ह्यांचे समन्वयक सहभागी झाले होते.

First published:

Tags: Maratha kranti morcha, Maratha reservation, Udayan raje bhosle, मराठा आरक्षण maratha aarakshan