BREAKING: मालेगावात मोठी कारवाई, बांगलादेशी घुसेखोराच्या मुसक्या आवळल्या

BREAKING: मालेगावात मोठी कारवाई, बांगलादेशी घुसेखोराच्या मुसक्या आवळल्या

आरोपींकडे सापडले एमआयएम आणि काँग्रेस आमदाराचं लेटरहेड...

  • Share this:

मालेगाव, 6 नोव्हेंबर: बांगलादेशी घुसेखोर नागरिक (bangladeshi people) प्रकरणी मालेगाव पोलिसांनी (Malegaon Police) शुक्रवारी मोठी कारवाई केली. पोलिसांनी एका बांगलादेशी घुसखोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. एवढंच नाहीतर बांगलादेशी नागरिकाला मदत करणाऱ्या 6 संशयितांनाही ताब्यात घेतलं आहे.

मालेगाव शहरातील आयेशा नगर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा...मासेमारी मामा-भाच्याच्या जीवावर बेतली, पुण्यात महादेवाच्या तळ्यात बुडून मृत्यू

बनावट पासपोर्ट प्रकरणाचे मालेगाव कनेक्शन मुंबई पोलिसांनी उघडकीस आणल आहे. यानंतर मालेगाव शहरातील पोलिस यंत्रणा खळबडून जागी झाली आहे. शहरातील आयेशा नगर पोलिसांनी येथील हजार खोली तसेच शहरातील विविध भागातून एक बांगलादेशी नागरीक व त्यांना बनावट कागदपत्रे तयार करून देणार्‍या सहा जणांना अटक केली आहे.

आयेशानगर पोलिसांनी आलम अमीन अन्सारी (वय-38) या बांगलादेशी नागरिकासह शेख अश्पाक शेख मुनाफ कुरेशी (रा. हजार खोली), एकलाख मोहम्मद मोहम्मद मुस्तफा (रा. नयापुरा), शेख इमरान शेख रशीद (रा. नागछाप झोपडपट्टी), इक्बाल खान मुनीर खान (रा. तंजीब नगर), ललित नाना मराठे (रा. कैलास नगर) व जाकिर अली अब्दुल मजीद खान (रा. अखतराबाद, मालेगाव) अशा सात जणांना अटक केली आहे. तर जहिर हाशिम हनिबा हा बांगलादेशी नागरिक फरार झाला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून बांगलादेशी नागरिकांना मदत करणारे आणखी किती जण शहरात आहेत, याचा कसून तपास केला जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

आरोपींकडे एमआयएम आणि काँग्रेस आमदाराचं लेटरहेड...

बांगलादेशी नागरिकांना नागरिकत्व मिळवून देण्यासाठी काम करणाऱ्या दोन दलालांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. दोघांकडून अनेक बनावट कागदपत्रे जमा करण्यात आली आहेत. यात मालेगावचे विद्यमान एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल व काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांचे लेटरहेड सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मालेगावमध्ये हे वृत्ता पसरताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल व माजी आमदार आसिफ शेख यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी आपल्या लेटरहेडचा गैरवापर झाला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. याबाबत पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल व माजी आमदार आसिफ शेख यांनी केली आहे.

हेही वाचा...हिम्मत असेल तर फिल्मसिटी युपीत नेऊन दाखवा, उद्धव ठाकरेंचं योगींना ओपन चॅलेंज!

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मोठ्या संख्येने बनावट आधारकार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, बँक व पोस्ट पासबुक, रबर स्टॅम्प, शाळा सोडल्याचा दाखला आदी कागदपत्र जप्त केले.

Published by: Sandip Parolekar
First published: November 6, 2020, 5:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading