मुंबई, 31 ऑगस्ट: अभिनेता सुशांत सिंह रजपूत याच्या केसच्या तपासात चर्चेत आलेल्या 'ड्रग्स, पब आणि पार्टी' कल्चरचे अनेक अड्डे वांद्रे पश्चिम परिसरात आहेत. त्याविरोधात गेली अनेक वर्षे लढणाऱ्या भाजप नेते आणि वांद्रे पश्चिम विधानसभेचे आमदार अँड.आशिष शेलार यांनी सोमवारी पुन्हा एकादा मुंबई पोलिसांना पत्र लिहून धडक कारवाईची मागणी केली आहे.
हेही वाचा...कोरोनाच्या ब्रेकनंतर राज ठाकरे अॅक्टिव्ह! औरंगाबादेत शिवसेनेला दिला 'दे-धक्का'
मुंबई आणि विशेषत: माझ्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातील अवैध अंमली पदार्थांच्या समस्येसंदर्भात आशिष शेलार यांनी मुंबई पोलिसांचं लक्ष वेधलं आहे. सुशांतसिंग राजपूत या तरुणाच्या कथीत मृत्यूनंतर त्याच्या केसच्या तपासात त्यांच्या मित्रमंडळातील अनियंत्रित अमली पदार्थांचा वापर केल्याचे मीडियातून समोर आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ड्रग्स माफियांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षभरात आपण याबाबत कडक कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांकडे वारंवार विनंती केली होती, असंही आशिष शेलार यांनी सांगितलं आहे. 14 मार्च 2020 रोजी वांद्रे सीलिंक जवळील वस्ती व वांद्रे रिक्लेमेशनच्या परिसरात कार्यरत असलेल्या बेकायदेशीर ड्रग्स नेटवर्कच्या तक्रारीबद्दल डिसीपी, अँटी नारकोटिक्स सेलला एक सविस्तर पत्र लिहिले होते, परंतु त्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही, असा आरोप देखील आशिष शेलार यांनी केला आहे.
माझ्या मतदारसंघातील अमली पदार्थांच्या अड्डयांवर कारवाई करा आणि तरुणाईला वाचवा याचा पाठपुरावा मी सातत्याने करीत असून आज पुन्हा पोलिस आयुक्तांना विनंती केली. pic.twitter.com/aBsppda0br
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 31, 2020
ड्रग्सचं सेवन देशातील तरूणांचे आयुष्य उध्वस्त करीत असून मादक पदार्थांच्या व्यापाराशी संबंधित घटकांचा थेट संबंध भारताविरूद्ध काम करणाऱ्या परदेशी शक्तीशी आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आणि देशाच्या करमणूक उद्योगाचे मुख्य केंद्र असल्याने या राष्ट्रविरोधी दहशतवादी संघटनांचे मुंबई हे मुख्य टार्गेट आहे.
वांद्रे, खार, सांताक्रूझ या मतदारसंघ क्षेत्रात अनेक पब, बार आणि रेस्टॉरंट्स आहेत. जे कायद्यांचे किंवा नियमांचे उल्लंघन करीत असून संबंधित यंत्रणांचे अधिकारी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. या पब पैकी बर्याचजणांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले आहे. परवानगी दिलेल्या वेळेच्या पलीकडे अनियंत्रित नाईटलाइफ पार्ट्या सुरु असतात. हीच ठिकाणे दुर्दैवाने बेकायदेशीर ड्रगच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न होतो. पोलिस आणि महापालिका दुर्लक्ष करीत असल्याने हे सारे राजरोस पणे सुरु आहेत, असाही घणाघाती आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.
1990 च्या उत्तरार्धात ज्याप्रमाणे मुंबई पोलिसांनी मुंबईतील अंडरवर्ल्ड नष्ट केले, त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांनी मुंबईत कार्यरत असलेल्या या सर्व ड्रग माफियांचे नेटवर्क नष्ट करण्यासाठी धडक मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. अशा नेटवर्कमधील संबंधीत मालमत्ता जप्त करून कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.
हेही वाचा...परवानगीविनाच सुशांतच्या मृतदेहाजवळ गेली होती रिया; रुग्णालयाची धक्कादायक माहिती
सुशांतसिंग राजपूत यांच्या साथीदारांनी वापरलेल्या बेकायदेशीर ड्रग्स वांद्रे सी लिंक प्रोमेनेड, आय लव्ह मुंबई परिसर, वांद्रे पश्चिम, रेक्लेमेशन परिसरात राहुल नगर, नर्गिस दत्त नगर, रंगशारदा हॉटेलच्या समोर आणि मागील बाजू, वांद्रे पश्चिम, बीएमसी गार्डन (जनरल अरुणकुमार वैद्य गार्डन) अरुण कुमार वैद्य नगर समोर, गझदर बांधची खाडीजवळची अवैध झोपडपट्टी, मुरगन चाळ, सांताक्रूझ पश्चिम, वांद्रे स्टेशन पश्चिम परिसरातील शास्त्री नगर, ओएनजीसी लेन वरीव पब आणि बार, वांद्रे रिक्लेमेशन या ठिकाणांहून आणल्या गेल्या असाव्यात, असा संशय शेलार यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे याचे गांभीर्य आता तरी पोलीस प्रशासनाने लक्षात घेणे आवश्यक आहे. माझ्या मतदारसंघातील बेकायदेशीर अंमली पदार्थांचे अड्डे असलेली खालील ठिकाणे असून स्थानिक वारंवार याबाबत तक्रार करीत आहेत.