हर्षल महाजन, नागपूर 30 जुलै : नागपूर जिल्ह्यातल्या पालासावळी कोंडासावळी गावात जिल्हापरिषद कडून तयार करण्यात आलेल्या जलयुक्त शिवाराच्या कामाचं खरं रुप पावसानं उघड झालं. दोन तीन महिन्याआधी 1 ते दीड कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला जलयुक्त शिवराचा बंधारा एकाच पाण्यात गेला वाहुन गेल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. हे काम लघुसिंचन विभाग जिल्हा परिषद नागपूर यांनी केलं होतं. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं केलं होतं असा आरोप गावकऱ्यांनी केलाय.
'सिलेंडर'चा ट्रक पुलाला धडकला, 100 सिलेंडर नदीत गेले वाहून
या बंधाऱ्याचे काम सुरू असतानाच गावचे सरपंच रवींद्र ठाकूर व गावकऱ्यांनी कामाच्या गुणवत्ते संदर्भात प्रश्न निर्माण केले होते. त्याचबरोबर त्याची तक्रारही केली होती. पण तेव्हा त्यांचा आवाज दडपण्यात आला होता. रस्ता असो किंवा बंधारा किंवा कॅनलचं काम सर्व ठिकाणी असंच होत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच असं होत असेल तर इतर जिल्ह्यांची काय कथा असा प्रश्न सामाजिक कार्यर्त्यांनी केलाय.
पुराच्या पाण्यात अडकली ST बस, 29 प्रवाशांची थरारक सुटका
या भागात मुसधार पाऊस झाल्याने सगळ्याच जलाशयांमध्ये पाण्याचा मोठा साठा झाला होता. या बंधाऱ्यातही पाणी साठत होतं. गेल्या दोन दिवसांमध्ये पाणी वाढत गेल्याने बंधाऱ्यावर ताण आला. या बंधाऱ्याचं कामच निकृष्ट दर्जाचं झाल्याने पाण्याचं ओझं तो बांधारा पेलवू शकला नाही. बंधाऱ्यात पाण्याचा जास्त साठा असता तर मोठा अनर्थ घडला असता. या घटनेमुळे आता अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. इतर सर्वच बंधाऱ्यांची तपासणी व्हावी अशी मागणीही आता करण्यात येत आहे.