• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • धक्कादायक, सिझर करताना पोटात राहिली बँडेजची पट्टी, महिलेचा दुर्दैवी मृत्यू

धक्कादायक, सिझर करताना पोटात राहिली बँडेजची पट्टी, महिलेचा दुर्दैवी मृत्यू

डॉक्टरांनी सोनोग्राफी करून तपासणी केली असता पोटात बँडेजची पट्टी असल्याचे दिसून आले.

 • Share this:
  बुलडाणा, 24 जून:  गरोदर महिलेचं सिझर (cesarean operation) करत असताना डॉक्टराकडून (doctor) बँडेज पट्टी पोटात राहिल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना बुलडाण्यात (buldhana) घडली आहे. डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळेच महिलेला मृत्यू झाला असून डॉक्टरावर कडक कारवाई करावी, अशी मागणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील कवठळ इथं राहणारे परमेश्वर पाखरे यांची  पत्नी पूजा पाखरेला गरोदर होती. 7 एप्रिल रोजी प्रसूती कळा जाणवू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी सिझर केले. पूजाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. पण सिझर झाल्यानंतर पूजाच्या पोटात अचानक दुखायला लागले. पाच दिवस ती रुग्णालयातच होती. पण पोट दुखणे काही थांबले नाही. पोट दुखणे थांबत नसल्यामुळे पूजाला पुढील उपचारासाठी अकोला येथे नेण्यात आले होते. 19 तारखेला पूजावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयातून तिला सुट्टी देण्यात आली आणि ती घरी आली. पण, पुन्हा पोटात दुखायला लागले. WTC Final : विजेतेपदानंतर न्यूझीलंड मालामाल, टीम इंडियाचाही खिसा गरम! त्यामुळे परमेश्वर यांनी पुन्हा 10 जून रोजी खामगाव येथील खासगी रुग्णालयात पत्नीला रुग्णालयात दाखल केले. खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सोनोग्राफी करून तपासणी केली असता पोटात बँडेजची पट्टी असल्याचे दिसून आले. त्यानंतर तातडीने शस्त्रक्रिया करून पोटातील बँडेज बाहेर काढण्यात आली. शस्त्रक्रिया केल्यानंतर सुद्धा पूजाचा त्रास काही कमी झाला नाही. त्यामुळे पुन्ह बुलडाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ‘तोंडाला निळा रंग का फासते आहेस?’ कंगनाचे व्हायरल फोटो पाहून चाहते बुचकळ्यात प्रसुतीदरम्यान, बँडेज पोटात राहिल्यामुळेच पूजाचा मृत्यू झाला असा आरोप करत हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करावी, अशी मागणी पाखरे कुटुंबीयांनी केली आहे, असं वृत्त दैनिक दिव्य मराठीने दिले आहे.
  Published by:sachin Salve
  First published: