आज पालघर जिल्हा बंद

आज पालघर जिल्हा बंद

सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीतर्फे आज पालघर जिल्हा बंदचा पुकार करण्यात आला आहे. या बंदला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. वसई-विरार परिसर वगळता जिल्ह्यातील व्यवहार ठप्प झाले आहेत.

  • Share this:

पालघर,18 सप्टेंबर: सूर्या प्रकल्पाचे पाणी पालघर जिल्ह्याबाहेर वळविण्याचा निर्णय रद्द करण्यासाठी सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीतर्फे आज पालघर जिल्हा बंदचा पुकार करण्यात आला आहे. या बंदला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. वसई-विरार परिसर वगळता जिल्ह्यातील व्यवहार ठप्प झाले आहेत.

पालघर जिल्ह्यात असलेल्या सूर्या नदीवरील पाटबंदरे प्रकल्पाच्या पाण्यापासून पालघर, डहाणू, विक्रमगड तालुक्यातील 19 हजार एकर शेती वंचित राहिले असून जिल्ह्यातील ग्रामीण भागाला या धरणाचे पाणी मिळालेले नाही. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील मुख्यालय भागाला देखील सूर्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्यामुळे सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीतर्फे लक्ष वेधण्यात आले आहे. एकीकडे पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भाग कोरडा आणि सूर्याच्या पाण्यापासून वंचित राहिला असताना सूर्या प्रकल्पातील सुमारे 80 टक्के पाणी हे वसई-विरार, मिरा-भाईंदर शहरांकडे वळवण्यात आलं आहे असा आरोप देखील आरोप करत शासनाच्या या निर्णयाविरोधात बंद पाळण्यात येतोय. जिल्ह्यातील पाणी पळवून नेण्यात आल्याने पालघर, डहाणू, विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती- बागायतीसह अनेक नळ पाणीपुरवठा योजना संकटात सापडल्या आहेत. पालघरवासियांसाठी भविष्यात सूर्याचे पाणीच शिल्लक राहणार नसल्याने ह्या कोट्यवधींच्या योजनेतून गावागावातील घरापर्यंत गेलेल्या पाईपलाईन मधून त्यांना पाणीच पोहचणार नसल्याने ह्या विरोधात सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीने पालघर बंद ची हाक दिली होती.

बहुजन विकास आघाडी व्यतीरिक्त इतर सर्वच प्रमुख राजकीय पक्ष बंदमध्ये सहभागी झाले आहेत. पालघर- बोईसर, सफाळे, मनोर, डहाणू, कासा, तलासरी, विक्रमगड, जव्हार आदी भागात बंद ला उस्फुर्त प्रतीसाद लाभला आहे.

सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीच्या प्रमुख मागण्या

१. विरार - वसई, मिरा -भाईंदरला पाणी वळवण्याचा निर्णय तात्काळ रद्द करा

२. सूर्य प्रकल्पांतर्गत कालव्यांची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करा.

३. पालघर ग्रामीण भागातील गावांना सूर्याचे पाणी उपलब्ध करून द्या

४. पाण्याचा पुनर्वापर, पाण्याचे पुनर्भरण, खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर असे पर्याय आमलात आणल्याशिवाय शहरी भागाला पाणी पुरवठा करू नका

First published: September 18, 2017, 11:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading