दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही फटाकेबंदी?

दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही फटाकेबंदी?

दिल्ली हायकोर्टाने फटाके विक्रीवर बंदी आणली आहे. ही बंदी फक्त फटाके विक्रीवर असून फोडण्यावर नाही आहे. आता त्यात धरतीवर महाराष्ट्रात फटाके बंदी येणार आहे.

  • Share this:

मुंबई,10 ऑक्टोबर: दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही फटाकेबंदीवर चर्चा सुरू झालीय. विशेष म्हणजे आपले राज्यकर्तेही याबाबत उत्साही दिसत आहेत.

दिल्ली हायकोर्टाने फटाके विक्रीवर बंदी आणली आहे. ही बंदी फक्त फटाके विक्रीवर असून फोडण्यावर नाही आहे. आता त्यात धरतीवर महाराष्ट्रात फटाके बंदी येणार आहे. पण ही बंदी विक्रीवर असेल की फोडण्यावर हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.

पर्यावरणमंत्री रामदास कदमांना यावर विचारलं असता, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून फटाकेबंदीसाठी प्रयत्न करू, असं ते म्हणाले. मुंबईत प्रदूषणावर एक कार्यक्रम झाला, त्यात ते पत्रकारांशी बोलत होते. फटाक्यांमुळे हवेतला कार्बन डायॉक्साईड वाढतो आहे. त्यामुळे पावसात अनियमितता निर्माण होते. आणि त्याचा फटका माझ्या शेतकऱ्यांना बसतो, त्यामुळे फटाक्यांवर बंदी आणली पाहिजे, असं रामदास कदम म्हणाले.

आता खरोखरंच राज्यात फटाकेबंदी होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: October 10, 2017, 1:54 PM IST

ताज्या बातम्या