Home /News /maharashtra /

भरधाव बलेनो कार झाडावर आदळली, 3 जण जागीच ठार

भरधाव बलेनो कार झाडावर आदळली, 3 जण जागीच ठार

मारुती बलेनो कारने चार जण हे कळमेश्वरकडून नागपूरकडे जात होते. दहेगावजवळ पोहोचले असताना अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले.

नागपूर, 09 नोव्हेंबर : नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील कळमेश्वरमध्ये एका कारला (car accident) झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला आहे. या अपघातात एका गंभीर जखमीला नागपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहेगावजवळ रविवारी रात्री ही घटना घडली. मारुती बलेनो कारने चार जण हे कळमेश्वरकडून नागपूरकडे जात होते. दहेगावजवळ पोहोचले असताना अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली. फक्त 5,177 रुपयांत खरेदी करा सोनं, आजपासून घ्या 'या' योजनेचा फायदा हा अपघात इतका भीषण होता की, भरधाव कार झाडावर आदळल्यामुळे कारचा चुराडा झाला. या अपघातात कारमधील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला नागपूर येथे रुग्णालयात  दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेतली. क्रेनच्या मदतीने कारला बाजूला करण्यात आले आहे. कळमेश्वर नागपूर या रस्तावर पंधरा दिवसांआधी दुचाकीचा अपघात झाला होता. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. कळमेश्वर नागपूर रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहे. त्यामुळे अपघाताच्या घटना वारंवार घडत आहे. रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवण्यात यावे अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू दरम्यान, नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव लक्झरी बस आणि आयशर कारची जोरदार धडक झाली. रात्री उशिरा नाशिक-मुंबई महामार्गावर गोंदे गावाजवळ हा अपघात झाला. यामध्ये कारचं मोठं नुकसान झालं आहे. भरधाव कारनं समोरून येणाऱ्या बसला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडला आहे. निसर्गाची किमया! एकाच नदीत दिसतंय 5 रंगांचं पाणी, काय आहे जादू पाहा VIDEO मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 10 जण जखमी आहेत. पोलिसांनी जखमींना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तर दोन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या भीषण अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात गोंदे गावाजवळ झाल्याची माहिती मिळाली आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Police, नागपूर

पुढील बातम्या