'कोल्हापूर अमित शहांची सासुरवाडी, हवाई पाहणीपेक्षा त्यांनी मदत करावी'

'कोल्हापूर अमित शहांची सासुरवाडी, हवाई पाहणीपेक्षा त्यांनी मदत करावी'

'संकटाचं गांभीर्य सरकारला लक्षात आलं नाही. प्रशासन पातळींवर धोरण फसलं आहे. पालकमंत्र्यांचं लक्ष नव्हतं. संकटात जनतेबरोबर राहीलं पाहिजे ते काम सरकारनं केलं नाही.'

  • Share this:

मुंबई 13 ऑगस्ट : कोल्हापूरातला महापूर ओसरू लागला आणि राजकारणाला आणखी वेगात सुरूवात झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना चांगलंच धारेवर धरलंय. कोल्हापूर ही अमित शहांची सासुरवाडी आहे. त्यामुळे तरी त्यांनी जास्त मदत करावी फक्त हवाई पाहणी करू नये असा टोलाही त्यांनी शहांना लगावलाय. अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर, सांगली, कराड आणि बेळगावच्या पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली होती.

SPECIAL REPORT: लोकांची मनं जिंकण्यासाठी मोदींच्या जेम्स बॉन्डचं 'मिशन काश्मीर'

मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन थोरात यांनी काँग्रेसची भूमिका मांडली. ते म्हणाले, पूराची परिस्थिती गंभीर आहे. आता पूर ओसरल्यानंतर संकटं मोठी आहेत. असं असलं तरी प्रशासन अद्याप गतीने काम करत नाही. यामुळे स्थानिक लोक नाराज आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हवाई पहाणीपेक्षा अलमट्टी धरणातून लवकर पाणी सोडले असते, तर संकट कमी झालं असतं असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

मोठं नुकसान झालं तिथं केंद्र सरकारने तात्काळ मदत करावी. पाच हजार मदतीने काहीच होणार नाही. त्यांच पुर्नवसन होणे गरजेचं आहे. संपूर्ण कर्जमाफी झाल पाहीजे. जनावरांसाठी मदत दिली पाहिजे. इचलकरंजीतील कापड उद्योजकांना मदत होणे गरेजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

माणुसकीचं दर्शन.. स्वत: नायब तहसीलदारांनी पाठीवर वाहून नेली अन्नधान्याची पोती

पूरग्रस्त भागात काँग्रेस कंट्रोल रुम तयार करणार असून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे तिथे थांबतील असंही थोरात यांनी सांगितलं.

संकटाचं गांभीर्य सरकारला लक्षात आलं नाही. प्रशासन पातळींवर धोरण फसलं आहे. पालकमंत्र्यांचं लक्ष नव्हतं. संकटात जनतेबरोबर राहीलं पाहिजे ते काम सरकारनं केलं नाही असा आरोपही त्यांनी केलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 13, 2019, 3:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading