...आणि बाळासाहेब थोरातांनी राधाकृष्ण विखेंना बोलावून शेजारी बसवलं!

संगमनेरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याच्या मुलीच्या लग्नाचा लग्न सोहळा पार पडला. या लग्नमारंभात बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील आमनेसामने आले

संगमनेरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याच्या मुलीच्या लग्नाचा लग्न सोहळा पार पडला. या लग्नमारंभात बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील आमनेसामने आले

  • Share this:
    हरीष दिमोटे, प्रतिनिधी संगमनेर, 28 डिसेंबर : काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले राधाकृष्ण विखे पाटील यांची घरवापसीची चर्चा सुरू आहे. तर काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात नगर जिल्ह्यातील राजकारणात होणार संघर्ष सर्वश्रुत आहे. पण, आज या दोन्ही नेत्यांचा एक वेगळाचा अंदाज पाहण्यास मिळाला. संगमनेरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याच्या मुलीच्या लग्नाचा लग्न सोहळा पार पडला.  या लग्नमारंभात बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील आमनेसामने आले होते. यावेळी खुद्द बाळासाहेब थोरात यांनी विखेंना बोलावून आपल्या शेजारी बसवलं. यावेळी दोन्ही नेत्यामध्ये बरीच वेळ चर्चा सुरू होती. थोरात आणि विखे पाटील हे एकाच एकाच सोफ्यावर बसून चर्चा करत होते. दोन्ही नेत्यांनी चांगल्याच गप्पा रंगला होत्या. सकाळी एकमेकांवर टीका करणारे हे दोन्ही नेते एकत्र पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.. विखे पाटलांना बाळासाहेब थोरातांनी सल्लावजा टोला दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील हे पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.  'जिथं गेला तिथं सुखाने नांदा,' असा टोला बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला आहे. तसंच विखे पाटील यांनी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली का, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. राधाकृष्ण विखेंनीही घरवापसीचे वृत्त फेटाळले तर दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार का? असा प्रश्न विचारला असता राधाकृष्ण विखेंनी सत्ताधाऱ्यांवरच गंभीर आरोप केले आहेत. माझी बदनामी करण्याची कुणीतरी सुपारी घेतली आहे, अशी गंभीर टीका यावेळी विखेंनी केली. 'मी काँग्रेस पक्षात स्वगृही परतणार या बातम्या निराधार आहेत. अशा अफवा पसरवून कोणीतरी मला बदनाम करण्याची सुपारी घेतली' असल्याचं विखे म्हणाले. माझे सर्व पक्षातील नेत्यांशी संबंध आहेत. त्यामुळे मी सार्वजनिक जीवनात कुणाला भेटायचंही नाही का? राजकीय जीवनात आता कुणाशी संबधही ठेवायचे नाही का? असा संपप्त सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे. 27 डिसेंबरला राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लीकार्जुन खर्गे यांची एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये भेट घेतली होती. त्यामुळे विखे आता पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर प्रश्न विचारला असता व्यक्तीगत संबध ठेवू नये ही भूमिका दुर्दैवी आहे. विघ्न संतोषी लोक अशा प्रकारे संभ्रम पसरवताहेत. चुकीच्या पद्धतीने बदनामी करणारांविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचंही विखे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांच्या मागे कायम उभे राहणार आहे. त्यामुळे मी काँग्रेसमध्ये जाणार नसून भाजप कधीही सोडणार नसल्याची ठाम भूमिका विखे पाटील यांनी मांडली आहे. एकीकडे विखेंनी भूमिका स्पष्ट केली असताना दुसरीकडे  विखे पाटील यांनी स्वगृही परत येण्याचे ठरवले जरी असले तरी त्यांच्या परतीच्या निर्णय हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावरही अवलंबून असणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय हा अध्यक्षा सोनिया गांधी घेणार आहे. विशेष म्हणजे, विखे पाटील पक्षात परत यावे अशी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची इच्छा आहे. त्यासाठीच त्यांचे प्रयत्न देखील सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
    Published by:sachin Salve
    First published: