मुंबई, 23 जानेवारी : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनामध्ये त्यांच्या तैलचित्राच्या अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हजेरी लावली. राज ठाकरे यांनी या कार्यक्रमातलं भाषणही गाजवलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी सांगताना राज ठाकरे यांनी टोलेबाजी केली.
जवळपास तीन-सव्वातीन वर्षांनी विधानभवनात आणि मुंबईच्या रस्त्यांवर बाळासाहेबांच्या नावाच्या आधी हिंदू हृदय सम्राट असं लावण्यात आल्याचा टोला राज ठाकरे यांनी लगावला. तसंच उद्धव ठाकरे यांच्या गैरहजेरीबाबतही राज ठाकरे अप्रत्यक्षपणे बोलले. इकडे उपस्थित असलेल्या आणि नसलेल्या... असं म्हणत राज ठाकरेंनी शाब्दिक कोटी केली.
सुरेश जैन यांचा किस्सा
महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजप सरकार स्थापन करताना येत असलेल्या अडचणींवेळचा बाळासाहेबांचा किस्सा राज ठाकरे यांनी सांगितला. 'नारायण राणे मुख्यमंत्री असताना काही कारणास्तव मुख्यमंत्री पदावर युती अडकवली होती १५ दिवस तो खेळ सुरू होता. ऐकेदिवशी दुपारी जावडेकरांसह भाजप नेते मातोश्रीवर आले त्यांना बाळासाहेबांना भेटायचं होतं. आज सरकार बसतयं असे म्हणत ते ऐकायला तयार नव्हते मग निरोप द्या म्हटले,' असं राज ठाकरेंनी सांगितलं.
'सुरेशदादा जैन हे युतीचे मुख्यमंत्री बनतील हे कानावर घाला असं ते म्हणाले. मग मी बाळासाहेबांना निरोप द्यायला गेलो. मी त्यांना निरोप दिला त्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठी बसेल दुसरा नाही मग पून्हा वळून झोपले. मराठीसाठी बाळासाहेबांनी सत्तेलाही लाथ मारली,' असा किस्सा राज ठाकरे यांनी सांगितला.
मी लहानपणापासून साहेबांना पाहू शकलो, म्हणून स्वत:चा एक पक्ष काढू शकलो नाही तर, मी पक्ष काढू शकलो नसतो, अशी कबुलीही राज ठाकरे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Balasaheb Thackeray, Raj Thackeray, Shivsena