मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बाळासाहेबांच्या तैलचित्राचं विधिमंडळात अनावरण, व्यासपीठावर एकमेव 'ठाकरे'!

बाळासाहेबांच्या तैलचित्राचं विधिमंडळात अनावरण, व्यासपीठावर एकमेव 'ठाकरे'!

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विधिमंडळामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात येत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 23 जानेवारी : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विधिमंडळामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही आमंत्रण देण्यात आलं होतं, पण ते या कार्यक्रमाला आले नाहीत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे कुटुंबाला स्वत: फोन करून या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं होतं, पण तरीही ते आले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या अनावरण कार्यक्रमाला ठाकरे कुटुंबाकडून राज ठाकरे, स्मिता ठाकरे, अनुराधा जयदेव ठाकरे, निहार ठाकरे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विधानभवनात पोहोचताच राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केलं.

बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्र अनावरणाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर दिग्गज नेते उपस्थित होते, पण यामध्ये फक्त एकमेव ठाकरेंना स्थान मिळालं. या कार्यक्रमांच्या स्टेजवर राज ठाकरेही उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या स्टेजवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज ठाकरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह दिग्गज नेते व्यासपीठावर होते.

एकीकडे विधानभवनात बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्र अनावरणाचा कार्यक्रम सुरू असताना मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये ठाकरे गटाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे तसंच संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाचे नेते उपस्थित आहेत.

First published:

Tags: Balasaheb Thackeray, Raj Thackeray