बाळासाहेबांबद्दल शरद पवारांसह देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना

बाळासाहेबांबद्दल शरद पवारांसह देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना

राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांनी बाळासाहेबांच्या आठवणी जाग्या करत त्यांना अभिवादन केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 17 ऑक्टोबर : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतीदिन आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक येणार आहेत. तसंच राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांनी बाळासाहेबांच्या आठवणी जाग्या करत त्यांना अभिवादन केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे राजकीय विरोधक राहिले असले तरी त्यांच्या मैत्रीचे किस्सेही सर्वश्रुत आहेत. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शरद पवार यांनी खास शब्दांत त्यांना आदरांजली वाहिली आहे. 'प्रादेशिक अस्मितेचा हुंकार स्वाभिमानाने मिरवणारा मराठी माणूस स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केला आणि समाजकारणाला अग्रक्रम देणाऱ्या राजकारणाची सिद्धता केली. अमोघ वक्तृत्व आणि मुद्द्याला थेट भिडणारा रोखठोक स्वभाव यामुळेच बाळासाहेबांना अनुयायांचं निरपेक्ष आणि चिरंतर प्रेम मिळालं,' अशा शब्दांत शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राज्यात सत्तेचा तिढा आणि नवं राजकीय समीकरण राजकारणाच्या पटलावर असताना बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनाचं औचित्य साधत देवेंद्र फडवणीस यांनी बाळासाहेबांचा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला आहे. भाजपा-सेना राजकीय संबंधांत तणाव वाढला असतानाच फडवणीस यांचे हे ट्वीट महत्त्वाचं मानलं जात आहे.

दरम्यान, आज शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळावर मोठ्या संख्येने शिवसैनिक अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. सकाळी दहाच्या सुमारास शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासह स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. त्याचबरोबर राज्यातीलही इतर राजकिय पक्षांचे नेते देखील स्मृतीस्थळावर शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी येतील. यावेळी सर्वांचं लक्ष असणार आहे ते भाजप नेत्यांकडे. सध्याच्या राजकिय परिस्थितीत देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांची उपस्थिती 'गेमचेंजर' ठरणार का? याकडेच सर्व राजकिय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

गडकरींच्या 'गुगली'वर शरद पवारांचा 'षटकार', एकदा पाहाच हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2019 10:04 AM IST

ताज्या बातम्या