Elec-widget

शिवसेना राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार का? 20 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी दिलं होतं उत्तर

शिवसेना राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार का? 20 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी दिलं होतं उत्तर

राज्यात सध्या जशी परिस्थिती आहे तशीच 1999 मध्ये होती. तेव्हा एका मुलाखतीत बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी कऱणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. एकीकडे भाजप-सेना यांच्यात बिनसलं आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने शिवसेना सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे. राज्यातील सत्ता संघर्ष सुरु असताना आज रविवारी 17 नोव्हेंबर हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी 1999 ला एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तुम्ही राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर बाळासाहेब ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल परखड मत व्यक्त केलं होतं. त्यांची ही मुलाखतही त्यावेळी गाजली होती.

बाळासाहेब ठाकरे यांना विचारण्यात आलं होतं की, राजकारणात काही संभाव्यता असतात. तुम्ही शरद पवारांसोबत आघाडी करणार का? त्यावर बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं की, संभाव्यता? जर राजकारण बदमाश लोकांचा खेळ आहे असं म्हटलं असतं तर, तुम्ही बदमाश लोकांसोबत राहणार की सज्जनांसोबत? मी बदमाश लोकांसोबत नाही जाणार, दुष्ट लोकांसोबत आघाडी शक्य नाही. तसंच जो माणूस अटल बिहारी वाजपेयी यांच सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्याशी आम्ही हातमिळवणी कशी करू शकतो? मी तरी कधीच करू शकत नाही.

शरद पवारांचा उल्लेख करत बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की, जो माणूस सर्वांसमोर हे म्हणतो की सरकार पाडणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते काम केलं. मला माहिती आहे पवार यामध्ये तरबेज आहे. पण तुम्ही मतदारांविषयी विचार करा. ते कसे आमची आघाडी स्वीकारतील.

PHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली पाहायलाच हवीत अशी 10 व्यंगचित्रं

बाळासाहेबांच्या या मुलाखतीआधी आणि नंतर अनेकदा बाळासाहेब आणि शरद पवार एकाच मंचावर आले होते. 1982 मध्ये दोघांनीही एकत्र आंदोलनात भाग घेतला होता. त्यानंतर 1995 मध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखालील सरकारला विधानसभेत पराभूत करून भाजपसोबत पहिल्यांदा महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं होतं.

Loading...

1999 च्या निवडणुकीत काँग्रेसला 75, शिवसेनेला 69, राष्ट्रवादीला 58, तर भाजपला 56 जागांवर विजय मिळाला होता. तेव्हा शिवसेनेने सरकार स्थापनेचे केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले होते. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी निवडणुकीनंतर आघाडी स्थापन केली आणि अपक्ष आमदारांना सोबत घेऊन सरकार स्थापन केलं. त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले होते.

बाळासाहेबांबद्दल शरद पवारांसह देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2019 01:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com