मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर सशर्त जामीन मंजूर

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर सशर्त जामीन मंजूर

केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांना रात्री महाड महाड न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते

    महाड, 24 ऑगस्ट :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery)  यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांना रात्री महाड महाड न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते. पोलिसांनी राणे यांची 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. परंतु, न्यायालयाने दोन्ही बाजूंने युक्तीवाद ऐकून राणेंना जामीन मंजूर केला आहे. नारायण राणे यांना गोळवलीमध्ये अटक केल्यानंतर महाड इथं आणण्यात आले. त्यानंतर महाड न्यायदंडाधिकारी बाबासाहेब पाटील यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यावेळी, राणे यांचे कुटुंबीय सुद्धा न्यायालयात हजर होते. Hand gloves घालून अवयवांना स्पर्श केला तर तो अपराध नव्हे काय?- ऍटॉर्नी जनरल यावेळी पोलिसांनी राणे यांची सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. परंतु, नारायण राणे यांचे वकील अनिकेत निकम आणि भाऊ साळुंके यांनी युक्तिवाद केला. नारायण राणे यांचं वय आणि प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना जामीन द्यावा, अशी मागणी करण्यात आली. राणेंना कोणती औषधे सुरू आहेत याबाबत वकिलांनी न्यायालयात माहिती दिली. यासोबत प्रकृती पाहता जामीन द्यावा अशी विनंती केली आहे.  राणेंना मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास आहे, यावर त्यांची औषध सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली. श्री छत्रपती शिवाजीराजे अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे इथे प्रोफेसर पदासाठी नोकरी तसंच, नारायण राणे यांना अटक करण्यापूर्वी कोणतीही नोटीस देण्यात आली नसल्याचे राणेंच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. नारायण राणे यांना जामीन मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती, त्यामुळे महाड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु, राणे यांच्या बचावासाठी मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते सुद्धा महाड शहरांमध्ये दाखल झाले आहेत. रत्नागिरी, रायगड, मुंबई या विविध भागातून राणेसमर्थक मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये दाखल झाल्याने पुन्हा एकदा शिवसैनिक भाजपचे कार्यकर्ते समोर समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या