लढत विधानसभेची : बागलाणमध्ये बोरसे आणि चव्हाण या कुटुंबांभोवती फिरतंय राजकारण

लढत विधानसभेची : बागलाणमध्ये बोरसे आणि चव्हाण या कुटुंबांभोवती फिरतंय राजकारण

बागलाण मतदारसंघात बोरसे आणि चव्हाण या दोन पारंपरिक कुटुंबात होणाऱ्या निवडणुकीत यंदा मतदार नवख्या उमेदवाराला निवडणार की पुन्हा या दोन्ही कुटुंबापैकी कुणा एकाला हे निवडणुकीनंतर दिसेल.

  • Share this:

नाशिक, 18 सप्टेंबर : बागलाण मतदारसंघात बोरसे आणि चव्हाण या दोन पारंपरिक कुटुंबात होणाऱ्या निवडणुकीत यंदा मतदार नवख्या उमेदवाराला निवडणार की पुन्हा या दोन्ही कुटुंबापैकी कुणा एकाला हे निवडणुकीनंतर दिसेल.

बागलाण मतदारसंघ हा 40 वर्षापूर्वी अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आणि त्यानंतर या मतदार संघात बोरसे आणि चव्हाण या दोन कुटुंबातल्या सदस्यांपैकीच उमेदवार विजयी होत आले.

1995 साली माजी आमदार दिलीप बोरसे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्यानंतर माजी आमदार संजय चव्हाण यांनीही अपक्ष आणि मग राष्ट्रवादी असा प्रवास करत आमदारकी मिळवली. माजी आमदार दिलीप बोरसे यांचा भाऊ उमाजी बोरसे यांनी भाजपाकडून उमेदवारी करत विजय मिळवला. त्यामुळे याच दोन कुटुंबांमध्ये आमदारकी फिरत राहिली.

लढत विधानसभेची : कन्नडमधून हर्षवर्धन जाधव पुन्हा आमदार होणार?

2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार संजय चव्हाण यांच्या पत्नी दीपिका चव्हाण या राष्ट्रवादीकडून विजयी झाल्या तर भाजपच्या उमाजी बोरसे यांचा पराभव झाला. मोदी लाटेचा प्रभाव असतानाही बागलाणमध्ये दीपिका चव्हाण यांनी आपला गड राखला.चव्हाण आणि बोरसे या दोन कुटुंबातल्या सदस्यांमध्येच आजपर्यंत निवडणुका होत असल्या तरी यंदा मात्र अनेक नवीन चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरायला सज्ज झाले आहेत. ते या कुटुंबांची सत्ता मोडून काढतात का हे पाहावं लागेल.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत झालेलं मतदान

दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी) -68 हजार 434

दिलीप बोरसे (भाजपा) - 64 हजार 253

साधना गवळी (शिवसेना)- 9 हजार108

जयश्री बर्डे (काँग्रेस)- 6 हजार 946

============================================================================================

VIDEO 'आरे' वाचवण्यासाठी काँग्रेसचे माजी पर्यावरणमंत्री शिवसेनेच्या साथीला, काय म्हणाले ऐका

Published by: Arti Kulkarni
First published: September 18, 2019, 6:04 PM IST

ताज्या बातम्या