गाडीचं ऑईल लिक झाल्याचं सांगून बॅग लिफ्टिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

गाडीचं ऑईल लिक झाल्याचं सांगून बॅग लिफ्टिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि दिल्ली या ठिकाणी ही टोळी सक्रीय होती.

  • Share this:

नाशिक, 4 नोव्हेंबर: राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या गाड्या थांबवूव तुमच्या गाडीचं ऑईल लिक होत असल्याच सांगून बॅग लिफ्टिंग करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा (Interstate Racket) नाशिक पोलिसांनी (Nashik Police)पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी भामट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

क्राईम युनिट 1 ने इंदूर (मध्यप्रदेश) (Indore,MP)येथे जाऊन ही कारवाई केली आहे. आरोपींकडून 10 लाख 86 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा...पुणे- सोलापूर महामार्गावर सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! मराठी तरुणीसह तिघींची सुटका

महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि दिल्ली या ठिकाणी ही टोळी सक्रीय होती. गाडीचं ऑईल लिक होत असल्याच सांगून बॅग लिफ्टिंग करत होती. या टोळीकडून अजूनही मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) संग्रामसिंह निशानदार यांनी दिली आहे.

दिवसाढवळ्या लुटायचे कपड्यांचं दुकान...

दुसरीकडे, अशाच एका टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. देहूरोड शहरातील ऐतिहासिक बाजारपेठेत धमकी देत चोरी करणाऱ्या गुंडांच्या टोळीला पोलिसांनी अखेर जेरबंद केलं आहे. गेले दोन दिवस या टोळीने रेडीमेट कापडाच्या दुकानात धाक दाखवत तसेच जीवे मारण्याची धमकी देत 25 हजार रुपयांच्या कपड्याची चोरी केल्याचं उघड झालंय. या प्रकरणी जणांच्या टोळीला क्राईम ब्रांचच्या युनिट 5 च्या पथकाने जेरबंद केले आहे. पोलिसांना आलेल्या एका फोन कॉलमुळे आणि पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेने दिवसा ढवळ्या कपड्यांची दुकाने लुटणारी ही टोळी जेरबंद झाली आहे.

सतत होणाऱ्या गुंडांच्या त्रासाला कंटाळून व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवणार असल्याच्या निर्णयाने खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरून गुन्हेगारांना मोठ्या शिताफीने पाठलाग करून अटक केली आहे.

हेही वाचा...'कोरोना'चा पराभव करून घरी आलेल्या देवेंद्र फडणवीसांचं असं झालं स्वागत! PHOTO

शेऱ्या उर्फ ऋषिकेश आडागळे, विजय पिल्ले, अल्बर्ट जोसेफ, आतिष शिंदे, राहुल टाक, अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांनी पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली आहे. भर बाजारपेठेत घडलेल्या थरारक गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दोन पथके तयार केली होती. आरोपीचा तात्काळ शोध घेण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या होत्या.

Published by: Sandip Parolekar
First published: November 4, 2020, 8:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या