'बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सरकार पडेल, शिवसेना विरोधी पक्षात बसेल'

'बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सरकार पडेल, शिवसेना विरोधी पक्षात बसेल'

काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही' असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं. त्यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा धुसफूस वाढण्याची चिन्ह

  • Share this:

अमरावती, 31ऑक्टोबर: महाविकास आघाडी सरकारमध्ये (maha vikas aghadi) काही दिवसांपूर्वी कामासाठी निधी मिळत नसल्याचे आरोप करत काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी केला आहे. काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही' असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं. त्यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा धुसफूस वाढण्याची चिन्ह आहे. यावर बडनेराचे आमदार रवी राणा यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी निर्माण होईल. तसेच बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रात आघाडी सरकार पडेल आणि शिवसेना विरोधी पक्षात बसेल, असा पुनरुच्चार आमदार रवी राणा यांनी केला आहे.

हेही वाचा...संजय राऊतांना इतरांनी केलेली टीका लगेच टोचते, चंद्रकांत पाटलांचा सेनेवर पलटवार

आमदार रवी राणा यांनी सांगितलं की, महाराष्ट्रात सध्या तीन पक्षाचा सरकार असून त्याला महाविकास आघाडी सरकारचा नाव देण्यात आलेलं आहे. परंतु महाविकास आघाडीचा घटक असलेल्या काँग्रेसला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य निधी देत नाहीत. काँग्रेस शासित महापालिकांमध्ये काँग्रेससोबत दुजाभाव करत असल्याचा घणाघाती आरोप खुद्द सरकारमधील वजनदार नेते अशोक चव्हाण यांनी परभणीत केला.

महाविकास सरकार बिहार निवडणुकांनंतर पडेल व शिवसेना हे विरोधी पक्षात बसेल, असा पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, आमदार रवी राणा यांना कितपत गांभीर्याने घ्यायचे यावर राजकीय मंडळी खल करत आहेत.

अशोक चव्हाणांचं मोठं विधान...

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी परभणीच्या दौऱ्यावर होते. यावेळी अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी, 'काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. नांदेडलाही निधी मिळाला नाही, पण मी सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री आहे, त्यामुळे निधी मिळवून दिला', असं चव्हाण यांनी सांगितले.

पत्रकारांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याबद्दल आरोप केला आहे, असा सवाल विचारला असता, अशोक चव्हाण म्हणाले की, ' मुळात चंद्रकांत पाटील यांच्याकडे असलेले खड्डे बुजवण्याचे काम माझ्याकडे आले आहे, तेच मी करत आहे. संपूर्ण मराठवाड्यासह राज्यात चांगले रस्ते झाले पाहिजे, यासाठी मी विमानाने नाहीतर कारने फिरत आहे', असं म्हणत सणसणीत टोला लगावला.

हेही वाचा..काँग्रेसची आमदारकीची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली, वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट

त्याचबरोबर, 'महाविकास आघाडी सरकार स्थापन करत असताना शिवसेनेसोबत एकत्र येण्याची चर्चा सुरू होती. त्यावेळी दिल्लीतील नेत्यांमध्ये सेनेसोबत जाण्याबद्दल नाराजी होती. इतर राज्यांमध्ये भाजपकडून काँग्रेसला संपवण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे, असं दिल्लीतील नेत्यांना मी पटवून दिले. त्यानंतर आम्ही महाविकास आघाडीत सामील झालो', असंही अशोक चव्हाण यांनी सांगितले.

Published by: Sandip Parolekar
First published: October 31, 2020, 4:55 PM IST

ताज्या बातम्या