मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिवसेना आणि काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये रंगला बॅडमिंटनचा सामना, VIDEO

शिवसेना आणि काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये रंगला बॅडमिंटनचा सामना, VIDEO

दोन्ही मंत्र्यांनी रॅकेट हातात घेऊन आपल्यातल्या खेळाडू वृत्तीचे दर्शन घडवले, नंतर दोन्ही मंत्र्यांनी येथील जिममध्ये व्यायामही केलं.

दोन्ही मंत्र्यांनी रॅकेट हातात घेऊन आपल्यातल्या खेळाडू वृत्तीचे दर्शन घडवले, नंतर दोन्ही मंत्र्यांनी येथील जिममध्ये व्यायामही केलं.

दोन्ही मंत्र्यांनी रॅकेट हातात घेऊन आपल्यातल्या खेळाडू वृत्तीचे दर्शन घडवले, नंतर दोन्ही मंत्र्यांनी येथील जिममध्ये व्यायामही केलं.

गडचिरोली, 21 ऑगस्ट : राज्यात कोरोनाची (corona) लाट ओसरल्यामुळे मंत्र्यांचे दौरेही वाढले आहे. आज गडचिरोलीचा (gadchiroli) राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी एकत्र दौरा केला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बॅडमिंटनचा (Badminton) सामना पाहण्यास मिळाला. राज्याचे नगरविकास मंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. आज गडचिरोली येथील शासकीय जलतरण तलाव आणि जिमची पाहणी त्यांनी केली. यावेळी गडचिरोलीतल्या बॅडमिंटन कोर्टवर एकनाथ शिंदे आणि राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यात बॅडमिंटनचा चांगलाच सामना रंगला होता. दोन्ही मंत्र्यांनी रॅकेट हातात घेऊन आपल्यातल्या खेळाडू वृत्तीचे दर्शन घडवले, नंतर दोन्ही मंत्र्यांनी येथील जिममध्ये व्यायामही केलं. अजबच! 'लंका मीनार' असं ठिकाण जिथं भाऊ-बहिणींना एकत्र प्रवेश नाही कारण... दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध नसल्याने अतिदुर्गम भागात अनेकांचे जीव गेले आहेत. तर अतिदुर्गम भागात लसीकरण करण्याचे मोठे आव्हान असून त्या गावापर्यंत पोहचण्यासाठी नव्या वाहनांची आवश्यकता होती. या सगळ्या गरजा पाहुन जिल्ह्यासाठी आज 47 वाहनांचे लोकापर्ण गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यात 9 रुग्णवाहिकासह लसीकरणासाठी 24 तर पोलीस विभागासाठी ९ वाहनांचा समावेश होता. नारायण राणेंची एकनाथ शिंदेंना ऑफर दरम्यान,  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा वसई विरारमध्ये सुरू आहे. सध्या शिवसेनेत एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली आहे, ते मार्ग शोधत आहेत. एक दिवशी तुम्हाला बोलवेन असं पत्रकारांना सांगितले. तेव्हा पत्रकारांनी ते तुमच्याकडे येणार आहेत का? असे विचारल्यावर आले तर घेऊ, शिंदेंचं नाही तर अनेक जण येण्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट राणेंनी केला आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या