Home /News /maharashtra /

मुंबईत ह्रदय प्रत्यारोपण झालेला पहिला रुग्ण अडकणार लग्न बंधनात, 30 नोव्हेंबरला होणार विवाहबद्ध

मुंबईत ह्रदय प्रत्यारोपण झालेला पहिला रुग्ण अडकणार लग्न बंधनात, 30 नोव्हेंबरला होणार विवाहबद्ध

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Heart transplant patient marriage: तीन ऑगस्ट 2015 रोजी अन्वरची परिस्थिती अत्यंत गंभीर होती. त्याला हृदय प्रत्यारोपणाशिवाय कोणताच पर्याय नव्हता.

    मुंबई, 11 नोव्हेंबर : अवयव प्रत्यारोपण ही संकल्पना आता आपल्याला नवी नाही. अवयवदानाबद्दल अद्याप पुरेशी जागरूकता नसली, तरी अलीकडे तशा घटना काही अंशी तरी कुठे ना कुठे घडत असल्याचं ऐकू येतं किंवा वाचनात येतं; पण अवयव प्रत्यारोपण करून जीवदान मिळालेली व्यक्ती किती जगते किंवा त्या व्यक्तीचं आयुष्य कसं असतं, याबद्दल फारसं काही वाचनात येत नाही. या पार्श्वभूमीवर, हृदय प्रत्यारोपण झालेल्या मुंबईतल्या पहिल्या रुग्णाच्या बाबतीत एक गुड न्यूज समोर आली आहे. बदलापूरमधला 28 वर्षांचा अन्वर खान (Anwar Khan) 30 नोव्हेंबरला विवाहबद्ध होत आहे. सहा वर्षांपूर्वी त्याच्यावर हृदय प्रत्यारोपण (Heart Transplant Operation) शस्त्रक्रिया झाली होती. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया भारतात आणि मुंबईत तुलनेने नव्या असल्या, तरी पाश्चिमात्य देशांत मात्र त्या तशा नव्या नाहीत. तिथल्या हृदय प्रत्यारोपण झालेल्या अनेक पेशंट्सना दीर्घ आयुष्य लाभलं आहे. या पार्श्वभूमीवर, अन्वरच्या निमित्ताने भारतातही सकारात्मक (Positive Feeling) वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. अन्वर म्हणतो, 'अनेकांना असं वाटतं, हृदय प्रत्यारोपण केलेला रुग्ण दीर्घ काळ जगू शकत नाही; मात्र मी अशा लोकांना सांगू इच्छितो, की त्यांनी त्यांचा हा विचार बदलावा.' वाचा : काय असतं लिवर डिटॉक्स म्हणजे? कसा होतो फायदा तीन ऑगस्ट 2015 रोजी अन्वरची परिस्थिती अत्यंत गंभीर होती. त्याला हृदय प्रत्यारोपणाशिवाय कोणताच पर्याय नव्हता. तेव्हा 42 वर्षांच्या मेंदूमृत महिलेच्या (Brain Dead Woman) कुटुंबीयांनी तिचं हृदय दान (Organ Donation) करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अन्वर खानला नवं आयुष्य मिळालं. अन्वरला गर्लफ्रेंड होती आणि त्याच्या हृदय प्रत्यारोपणाच्या कालावधीत ती त्याच्या जवळ होती. त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारचं साह्य तिने त्या वेळी केलं; मात्र नंतर तिच्या कुटुंबीयांकडून आलेल्या दबावामुळे तिला दुसऱ्या कोणाशी तरी विवाह करणं भाग पडलं. हृदय प्रत्यारोपणानंतर वर्षभर अन्वरची काळजी घेण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी दुसरा फ्लॅट भाड्याने घेतला होता. नंतर हळूहळू त्याचं रूटीन सुरू झालं. मग त्याच्या आई-वडिलांनी त्याच्यासाठी मुलगी पाहणं सुरू केलं. अनेक जणींनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांना अन्वरच्या हृदय प्रत्यारोपणाबद्दल कळल्यानंतरच त्याला नकार दिला. वाचा : पुरुषांमधील कोणती गोष्ट जी स्त्रियांना त्यांच्याकडं जास्त आकर्षित करते; वैज्ञानिक कारण काय? त्यानंतर शाझिया नावाच्या मुलीने त्याच्याशी लग्न करण्याची तयारी दर्शवली. तिच्या आई-वडिलांनीही तिला पाठिंबा दिला. अन्वर म्हणाला, 'शाझियाच्या कुटुंबीयांनी आमच्या घरी भेट दिली, तेव्हा आम्ही सगळे कामच करत होतो. मला जिममध्ये व्यायाम करतानाही त्यांनी पाहिलं. त्यानंतर त्यांना माझ्या फिटनेसबद्दल विश्वास निर्माण झाला.' 'मला माझा भूतकाळ विसरून नव्याने सुरुवात करायची आहे. ज्यांचं हृदय प्रत्यारोपण झालं आहे, त्या सर्वांना मी आवाहन करू इच्छितो, की त्यांनी त्यांचं आयुष्य निर्भयपणे जगावं,' असंही अन्वरने सांगितलं. पदवीधर असलेला अन्वर आयटी इंडस्ट्रीत नोकरी शोधत आहे. आता लग्नानंतर त्याचं नवं आयुष्य सुरू होणार आहे. वाचा : पूर्ण झोप न घेणाऱ्यांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण अधिक; महिलांवर होतोय सर्वाधिक परिणाम आपला आनंद व्यक्त करण्यास शब्द नसल्याची भावना अन्वरचे वडील जमील खान यांनी टाइम्स ऑफ इंडियाकडे व्यक्त केली. अन्वरचा मोठा भाऊ शोएब याचाही विवाह 30 नोव्हेंबरलाच होणार आहे. आपल्यावर ट्रान्स्प्लांट सर्जरी करणारे डॉक्टर अन्वय मुळे यांच्यासह सर्व टीमने आपल्या विवाहाला उपस्थित राहावं, अशी अन्वरची इच्छा आहे. अन्वरच्या विवाहामुळे हृदय प्रत्यारोपणाबद्दल शंकाकुशंका असलेल्या अनेकांच्या मनावर सकारात्मक परिणाम होणार मदत होणार आहे.
    First published:

    Tags: Badlapur, Marriage, Mumbai, Surgery

    पुढील बातम्या