मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुंबईजवळ 31 डिसेंबरआधी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकत 13 तरुणांना घेतलं ताब्यात

मुंबईजवळ 31 डिसेंबरआधी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकत 13 तरुणांना घेतलं ताब्यात

ढाब्याच्या नावाखाली हुक्का पार्लर चालवणाऱ्या अनधिकृत ढाब्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे. या धाडीनंतर 13 जणांवर कारवाई करण्यात आली.

बदलापूर, 27 डिसेंबर : सर्वजण नववर्षाचं स्वागत करताना सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत. अशातच ढाब्याच्या नावाखाली हुक्का पार्लर चालवणाऱ्या अनधिकृत ढाब्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे. या धाडीनंतर 13 जणांवर कारवाई करण्यात आली.

पूर्वेच्या बदलापूर कर्जत महामार्गा लगत असलेल्या सक्सेस पॉईंट या अनधिकृत ढाब्यात हे हुक्का पार्लर सुरू होते. स्थानिक पोलीस या हुक्का पार्लरवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करीत होते. मात्र उल्हासनगरच्या गुन्हे शाखेने इथे धाड टाकत डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर मधील 13 तरुणांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.

हेही वाचा - अकोल्यात गोळी झाडून एकाची हत्या, हल्लेखोर घटनास्थळाहून पसार

बदलापूर शहरात अनेक ठिकाणी ढाब्याच्या नावाखाली हुक्का पार्लरचा धंदा तेजीत आहे, मात्र आता गुन्हे शाखाने ही कारवाई करताच स्थानिक पोलिसांच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून तंबाखूजन्य पदार्थ बाळगणे आणि साथरोग प्रतिबंध कायद्याअंतर्गत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published:

Tags: Crime news, Maharashtra police