भाजप आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला अपघात, रुग्णालयात उपचार सुरू

भाजप आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला अपघात, रुग्णालयात उपचार सुरू

  • Share this:

बदलापूर, 13 डिसेंबर : मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. आमदार किसन कथोरे यांचे वाहन आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला.

अपघातात आमदार कथोरे जखमी झाले आहेत, तर दुचाकीवरील दोन जण गंभीर असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. कथोरे यांच्यावर बदलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुचाकीवरील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यातील एक जण अत्यवस्थ असल्याचं कळतंय.

आमदार किसन कथोरे हे टिटवाळा येथून एक कार्यक्रम आटपून पुन्हा बदलापूरच्या दिशेने येत असताना दहागांव वाहुली गावाजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीची आणि आमदारांच्या वाहनाची धडक झाली. त्यामुळे हा अपघात झाला. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून पंचनामा सुरू आहे.

दरम्यान, लोकप्रतिनिधींच्या गाडीला अपघात झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

(बातमी अपडेट होत आहे)

Published by: Akshay Shitole
First published: December 13, 2020, 8:08 PM IST

ताज्या बातम्या