पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा प्रताप, दुकानावर कारवाई करण्याऐवजी माल नेला उचलून!

पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा प्रताप, दुकानावर कारवाई करण्याऐवजी माल नेला उचलून!

वास्तविक हे दुकान नियमबाह्यपणे सुरू ठेवलं असतं, तरीही नियमानुसार, 5 हजार रुपये दंड ठोठावता येऊ शकला असता. मात्र...

  • Share this:

बदलापूर, 10 मे : बदलापूर पालिकेतील (badlapur municipal corporation) पथकाचा एक अजब कारभार समोर आला आहे. कोरोना (Corona) काळात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कारवाई करणारे हे पथक कारवाई करण्याऐवजी दुकानातील  मालच उचलून नेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सगळा प्रकार पटेल मार्टमधील (patel mart badlapur) सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

बदलापूर पूर्वेच्या कात्रप चौकातील पटेल मार्ट हे दुकान आहे. रविवारी सकाळी पालिकेचे पथक इथे आले आणि त्यांनी कारवाई करण्याऐवजी माल उचलून नेला. बदलापूर शहरात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, 8 मे पासून 15 मे पर्यंत असा 8 दिवसांचा कडक लॉकडाउन आहे. यामध्ये मेडिकल स्टोअर्स, रुग्णालय वगळता किराणा,भाजी मंडई  देखील बंद ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र, हे मार्ट होम डिलिव्हरीसाठी सुरू होतं.

'जन्नत' चित्रपटातील ही अभिनेत्री आठवतेय का? ट्रेडिशनल लूक मध्ये दिसतेय मननोहक

यावेळी पालिकेचे पथक कर्मचारी या दुकानात घुसले आणि त्यांनी दुकानातील सामान उचलून घेऊन गेले. ज्यामध्ये मिनरल वॉटरचे बॉक्स, सोड्याचा बॉक्स, अमुल कुलचा बॉक्स,एपीचा बॉक्स, हँडवॉशचा बॉक्स, बिस्किटांचा बॉक्स याचा समावेश होता. हा सगळा प्रकार दुकानातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. दुकान फक्त होम डिलिव्हरीसाठीच सुरू होते. तसंच ही घटना घडली त्यावेळी दुकानात कुणीही ग्राहक नव्हते, फक्त कर्मचारी होते.

पटेल मार्टने कोरोना नियमांचं उल्लंघन केले असेल तर बदलापूर पालिका पथकाने रीतसर कारवाई करायला हवी होती. मात्र अशा पद्धतीने स्मार्टमधील कर्मचाऱ्यांना काहीही न विचारता त्यांनी मार्टमधील वस्तू उचलून नेणे योग्य नव्हतं. मार्ट फक्त ऑनलाइन वस्तू मागवणाऱ्या ग्राहकांच्या घरी होम डिलिव्हरीसाठी उघडं ठेवण्यात आले होते. शिवाय दुकानात एक ही ग्राहक नव्हते. बदलापूरच्या पटेल मार्ट ब्रांचमध्ये मॅनेजर या महिला आहेत, त्यामुळे बदलापूर पालिकेचं हे पथक जेव्हा कारवाई करण्यासाठी पटेल मार्टमध्ये घुसलं, त्या वेळी महिला कर्मचारी घाबरल्या म्हणूनच या महिला कर्मचाऱ्यांसमोर बदलापूर पालिकेचे कर्मचारी वस्तू उचलून नेताना त्यांना त्याबाबत काहीही जाब विचारला नाही. दरम्यान, याप्रकरणी सोमवारी बदलापूर पालिकेतील अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही  बाब त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत, असं पटेल मार्टचे मालक भरत पटेल यांनी सांगितले आहे.

अक्षय तृतीयेला लॉकडाऊनमुळे सोनेखरेदी करता येणार नाही? करू शकता हे काम

वास्तविक हे दुकान नियमबाह्यपणे सुरू ठेवलं असतं, तरीही नियमानुसार, 5 हजार रुपये दंड ठोठावता येऊ शकला असता. मात्र दुकान बंद करायच्या नावाखाली दुकानातलं सामान उचलून नेले. या प्रकरणी मार्टचे मालक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, आता ही घटना समोर आल्यानंतर बदलापुर पालिकेचे मुख्याधिकारी या कर्मचाऱ्यांवर  कारवाई करतील का.?हे देखील पाहावं लागेल.

Published by: sachin Salve
First published: May 10, 2021, 7:43 AM IST
Tags:

ताज्या बातम्या