VIDEO : "खाली उतरलो असतो तर मृत्यू अटळ होता" मोबाईलमुळे बचावला 'तो' ट्रेकर!

VIDEO :

बदलापूरच्या चंदेरी किल्ल्यावर अडकलेल्या उदय रेड्डी या ट्रेकरची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

  • Share this:

गणेश गायकवाड, प्रतिनिधी

30 आॅक्टोबर : बदलापूरच्या चंदेरी किल्ल्यावर अडकलेल्या उदय रेड्डी या ट्रेकरची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली आहे. पनवेलच्या निसर्गमित्र ट्रेकर्स ग्रुपने रॅपिंगच्या साहाय्याने त्याला सुखरूप खाली आणलं. जवळजवळ ३० तासानंतर या टीमने मोठ्या अथक प्रयत्नांनी त्याला खाली उतरवलं. त्यामुळे त्याने या सगळ्याचे आभार मानले आहेत.

बदलापूर जवळील चंदेरी किल्यावर अडकलेल्या ट्रेकर्स उद्या रेड्डी ने अखेर सुटकेचा निश्वास टाकला. ३० तासांनंतर पनवेलच्या निसर्गमित्र ट्रेकर्स ग्रुपने रॅपिंगच्या साहाय्याने त्याला अथक प्रयत्न करून सोमवारी दुपारी त्याला सुखरूप खाली आणलं. मूळचा सिल्व्हासाचा असलेला उदय रविवारी सकाळी बदलापूरच्या चिंचवली गावातून चंदेरी किल्ल्यावर ट्रेकला जायला निघाला. मात्र पुढे गेल्यावर रस्ता चुकल्यानं तो चंदेरी ऐवजी म्हैसमाळच्या सुळक्यावर चढला आणि अडकून बसला.

मी चंदेरी किल्ल्यावर जाण्यासाठी निघालो होतो. पण रस्ता चुकल्यामुळे म्हैसळमाळच्या सुळक्यावर पोहोचलो. वरती पोहोचल्यावर खाली कसे उतरायचे हे माझ्यासाठी अशक्य होतं. जरी खाली उतरण्याचा प्रयत्न केला असता तर माझा मृत्यू अटळ होता.  मी सुळक्यावरून अडकल्यानंतर पुण्यातील मित्र राम जाधवला फोन केला आणि सगळी हकीकत सांगितली. राम जाधवने कल्याण पोलीस आणि निसर्ग ट्रेकर्स पनवेल या टीमला फोन करून कळवलं. त्यानंतर माझी सुटका झाली अशी माहिती उदयने दिली.

पनवेलच्या ट्रेकर टीमला एक ट्रेकर चंदेरीच्या शेजारी असलेल्या म्हैसळ सुळक्यावर अडकला असल्याची माहिती मिळाली. ज्या ठिकाणी हा पर्यटक अडकला होता, तिथे पोहोचणं ट्रेकर्सनाही अवघड बनलं होतं. त्यात रात्रीचा अंधार आणि विषारी सापांचा वावर यामुळे रात्री बचावकार्य थांबवण्यात आलं. सरतेशेवटी दुसऱ्यादिवशी सकाळी साडेआठच्या पुन्हा एकदा सुळक्यावर चढाई सुरू करून ट्रेकर्स साडेदहा वाजता त्याच्यापर्यंत पोहोचले आणि त्याला पनवेल मार्गी सुखरूप खाली उतरवलं.

दरम्यान, तीन महिन्यात चंदेरी किल्यावर पर्यटक अडकल्याची ही तिसरी घटना आहे. स्थानिकांकडून कोणतीही माहिती न घेता हे हौशी पर्यटक आपला जीव धोक्यात घालतात. त्यामुळे पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत कडक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

याआधीही ट्रेकर्स अडकले

१) याच महिन्यात ०१ ऑक्टोबरला ५८ वर्षाचे राजेंद्र शिंदे हे चंदेरी किल्ल्यावर भरकटले होती. त्यांची १८ तासांनी सुटका करण्यात आली.

२) २२ जुलै २०१८ ला एअर इंडियाचे ६ प्रशिक्षणार्थी विद्यार्थी मुसळधार पावसात अडकले होते.त्यांना २२ तासांनंतर सुखरूप खाली आणले होते.

====================

VIDEO: झाकणात अडकलेल्या सगळ्यात विषारी सापाला 'असं' केलं मुक्त

First published: October 30, 2018, 8:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading