हेमामालिनी रोज बंपर पिते,बच्चू 'कडू' बोलले

हेमामालिनी रोज बंपर पिते,बच्चू 'कडू' बोलले

शेतकरी दारू पिऊन आत्महत्या करतात हा आक्षेप खोडून काढताना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय.

  • Share this:

13 एप्रिल : शेतकरी दारू पिऊन आत्महत्या करतात हा आक्षेप खोडून काढताना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. दारू तर सगळेच पितात, आमदार-खासदार आणि पत्रकारही दारू पितात, अभिनेत्री हेमामालिनी तर रोज बंपर पिते मात्र तिनं आत्महत्या केली नाही असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय.

बच्चू कडू यांची आसूड यात्रेचं आज नांदेडमध्ये आगमन झालं, यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना बच्चू कडू यांनी आपल्या नेहमीच्या रोखठोक शैलीत सरकारवर टीका केली.

लग्नात खर्च वाढतो म्हणून शेतकरी आत्महत्या करतात असं गडकरी म्हणतात, पण त्यांच्या मुलाच्या लग्नात चार कोटी खर्च झाले, आता आम्ही गडकरींच्या आत्महत्येची वाट पाहावी का असा तिखट सवालही कडूंनी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2017 07:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading