दानवेंचा DNA पाकिस्तानचा; आमदार बच्चू कडूंनी घेतला समाचार

दानवेंचा DNA पाकिस्तानचा; आमदार बच्चू कडूंनी घेतला समाचार

आमदार बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे.

  • Share this:

मुंबई, 25 मार्च : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी 'पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले. त्यामुळे देशात प्रचंड रोष तयार झाला.' असं विधान केलं. त्यावरून आता त्यांच्यावर चौफेर टीका होताना दिसत आहे. त्यांच्या या विधानाचा आता आमदार बच्चू कडू यांनी समचार घेतला आहे. रावसाहेब दानवेंवर टीका करतना या 'दानवेचा DNA तपासून घ्या, हा पाकिस्तान चा असू शकतो, गांजा पिऊन भाषणे तर करतोच. भारतीय जवानांना अतिरेकी म्हणणारा साला दानवे तुम्ही खासदार करणार का?' असा सवाल यावेळी आमदार बच्चू कडू यांनी केला. रावसाहेब दानवे यांची वादग्रस्त विधानं करण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील रावसाहेब दानवे यांनी केलेल्या विधानावरून वाद झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजप राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा हाती घेऊन विरोधकांना लक्ष्य करत आहे. पण, या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलेल्या विधानावरून विरोधकांच्या हाती देखील चांगलाच मुद्दा लागला आहे.

कन्हैयाकुमारच्या उमेदवारीमुळे बेगुसराय बनलं 'हॉट सीट'

काय म्हणाले होते दानवे?

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. सोलापुरातील भाजप-शिवसेना युतीच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना रावसाहेब दानवे यांनी पुलवामा हल्ल्याचा संदर्भ देताना जवानांऐवजी अतिरेकी असा उल्लेख केला. दानवे म्हणाले की, 'पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले. त्यामुळे देशात प्रचंड रोष तयार झाला.' या वक्तव्यामुळे आता दानवे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

पुलवामा हल्ला

14 फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला होता. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक करत 200 ते 300 दहशतवद्यांचा खात्मा केला होता.

VIDEO : 'पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले', दानवेंची पुन्हा घसरली जीभ

First published: March 25, 2019, 7:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading